EC Arun Goel Resigns  Saam tv
देश विदेश

EC Arun Goel Resigns : आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा, २०२७ पर्यंत होता कार्यकाळ

EC Arun Goel Resigns News update : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ हा २०२७ पर्यंत होता.

Pramod Subhash Jagtap

EC Arun Goel Resigns:

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ हा २०२७ पर्यंत होता. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच राजीनामा दिल्याने शासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्याविषयी कोणालाही माहिती नव्हती. अरुण गोयल यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याविषयी कोणालाही पुसटशीही कल्पना नव्हती.

पश्चिम बंगालवरून परतली होती टीम

लोकसभा निवडणुकीविषयी बोलायचं झालं तर केंद्रीय निवडणूक आयोगाला तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जायचं आहे. तर केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम दोन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आली आहे. अरुण गोयल यांचं अचानक राजीनामा देण्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आज शनिवारी केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने अरुण गोयल यांच्या राजीनाम्याविषयी एक अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेत अरुण गोयल यांचा राजीनामा तातडीने स्वीकारण्याची विनंती राष्ट्रपतींना कारण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्रालय आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित केली होती. यावेळी देशभरातील सुरक्षेविषयी चर्चा झाली. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आंध्र प्रदेश, ओडिशा,सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर देशात लोकसभा निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यात होऊ शकते.

निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यानंतर दोन पदे रिक्त

अरुण गोयक यांनी निवडणूक आयुक्त पदाच्या राजीनाम्यानंतर २ जागा रिक्त झाल्या आहेत. अरुण गोयल यांनी २१ नोव्हेंबर २०२२ साली निवडणूक आयुक्तपदाची शपथ घेतली होती. अरुण गोयल हे १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT