Sharad Pawar : महाविकास आघाडीचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरला; स्वत: शरद पवारांनी केली नावाची घोषणा

Sharad Pawar Latest Speech : बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकारणावर राज्यभरातील लोकांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV
Published On

सचिन जाधव, पुणे

Sharad Pawar Speech :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाने आगामी लोकसभेसाठी जय्यत तयारी केली आहे. राज्यभरातील बालेकिल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकारणावर राज्यभरातील लोकांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडून बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. (Latest Marathi News)

शरद पवार आज पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान एका जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केले. संग्राम थोपटे, सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar
Devendra Fadnavis : पुण्यात आणखी एक विमानतळ तयार होणार; देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती

शरद पवार यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

१. आगामी लोकसभा निवडणुका लवकरत जाहीर होतील. १४-१५ तारखेला निवडणूक आयोग कार्यक्रम आखेल.

देशाचे भविष्य आणि भवितव्यासाठी निवडणुका आहेत. देशाचे अनेक जणांनी नेतृत्व केलं. देशाच्या भवितव्यची चिंता कधी नव्हती. पण गेले दहा वर्ष पाहिलं असता, आता बदल केला पाहिजे असं वाटतंय.

२. मी कृषीमंत्री असताना शेतकरी आत्महत्या का करतोय पाहिलं, कर्जमाफीसाठी आत्महत्या होत होत्या. सावकराकडून कर्ज काढलं जात होतं, ते सहन न झाल्याने आत्महत्या होत होत्या. आजही आत्महत्या होतात, सगळं होत असताना पंतप्रधान मोदी बघायला तयार नाहीत. सत्ता लोकांसाठी वापरायची असते. सत्तेचा गैरवापर होतोय. पंतप्रधान मोदी यांचं एकाच राज्याकडे लक्ष आहे. जे एका राज्याचे असेल तर देशाचे होऊ शकत नाही, तर अशा लोकांना निवडणुकीत हरवलं पाहिजे.

Sharad Pawar
Kolhapur Fire : कोल्हापुरात शाहू मिल परिसरातील घरांना भीषण आग, घटनास्थळी अनेक फटाक्यांची दुकाने

३. आज कसली गॅरंटी देता... काळा पैसा आणला नाही. काही केलं नाही. शेतकरी दिल्लीत आंदोलक करत होते, पण मोदींनी बघितले नाही. देशात महागाई. बेकारीचे गंभीर प्रश्न आहेत.

४. संजय राऊत, अनिल देशमुख यांनी काय केलं? त्यांना तुरुंगात टाकले. सत्तेचा गैर वापर केला जातोय.

आवर घालायचा असेल तर मतदान करायाला जाल, तेव्हा 'तुतारी'वर शिक्का मारा. आज बारामतीमधून लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर करतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com