Devendra Fadnavis : पुण्यात आणखी एक विमानतळ तयार होणार; देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती

Devendra Fadnavis Latest News in Marathi : पुणेकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. पुढील तीन वर्षात पुण्यात नवीन विमानतळ तयार होईल. पुढील वर्षी त्याचे काम सुरु होईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam Tv
Published On

नितीन पाटणकर, पुणे

Devendra fadnavis on News Pune Airport :

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. पुण्यात पुढील काही वर्षात आणखी एक नवीन विमानतळ बांधण्यात येणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. पुढील तीन वर्षात पुण्यात नवीन विमानतळ तयार होईल. पुढील वर्षी त्याचे काम सुरु होईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात विकसित भारत कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पुण्यासाठी मोठी घोषणा केली. पुण्याच्या विस्तारित विमानतळाचे उद्या उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर पुण्याला नवीन विमानतळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

Devendra Fadnavis
BJP- TDP: लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मिळाला नवा मित्रपक्ष, टीडीपी एनडीए आघाडी सामील

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील सविस्तर मुद्दे

१. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या विकसित भारत संकल्पनेवर २००० ते २०१४ पर्यंत काहीच काम झालं नाही.

२०१४ पासून कलाम यांच्या संकल्पनेवर खरे काम सुरु झाले. २०१३ मध्ये भारताची अर्थव्यवस्था फ्रजाईल(fragile) ५ मध्ये होती. तेथून मागील दहा वर्षात म्हणजे २०२३ मध्ये आपण जगातील पहिल्या पाच मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये आलो.

२. मागच्या काळात फक्त स्कॅम पहायला मिळायचे. महाराष्ट्राशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन आहे. ६० कोटी लोकांचे बॅंकेत अकाऊंट नव्हते. पंतप्रधान मोदींमुळे या लोकांची बॅंकेत खाती उघडली गेली. नऊ वर्षात २५ कोटी लोक गरीबी रेषेच्यावर आले. हा जागतिक विक्रम आहे.

३. एक हॅाटेल उभारायचे असेल तर १४६ सर्टिफिकेट लागायचे. ते आम्ही २५ वर आणले. असेच प्रत्येक व्यवसायात होते. तिथे आम्ही वन विंडो योजना आणली. ५० टक्के अर्थव्यवस्था कॅशमध्ये सुरु होते. ते बंद होऊन सगळे व्यवहार व्हाईटमध्ये आले. भारतात याआधी टेलिफोन बॅकिंग होते. एखादा नेता फोन करुन सांगायचा, हा माझ्या जवळचा आहे. त्याला लोन द्या. मग कर्ज घेतलेला व्यक्ती परत पैसेच भरायचा नाही.

Devendra Fadnavis
Lok Sabha Election 2024: कमल हसन यांच्या पक्षाची लोकसभा निवडणुकीतून एक्झिट, नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या

४. बोईंग आणि एअरबस भारतात येऊन एअरक्राफ्ट बनवणार आहेत. महाराष्ट्र एफडीआयमध्ये देशात लिडर आहे.

गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये जेवढी एफडीआय आली आहे. त्याच्या पेक्षा जास्त एफडीआय महाराष्ट्रात आली आहे.

५. २०३६ साली ऑलिम्पिक स्पर्धा भारतात होणार आहे. सर्जिकल आणि एअर स्ट्राऊकनंतर भारतात शातंता आहे. केंद्र सरकारच्या काळात दहशतवादी हल्ले ७६ टक्क्यांनी कमी झाले आहेत.

६. देशांच्या सीमेवर इन्फ्रास्ट्रक्चर वाढवले आहे. आधीचे सरकार म्हणायचे, चीनचे सैन्य तात्काळ सीमेवर येऊ शकते. पण, आपल्या हद्दीत रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चर नसल्याने ते पुढेच येऊ शकत नाही. हेच आपले धोरण आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com