Election Commission announces a critical change in counting process to improve transparency and trust in elections. Saam Tv
देश विदेश

Election Commission: मतमोजणीच्या नियमात बदल, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय

Postal Ballot Counting Now Mandatory: गेल्या काही दिवसांपासून निवडणुक आयोगावर विरोधकांकडून सातत्यानं आरोप केला जातायत.. त्यातच निवडणुक प्रक्रिया पारदर्शकता आणण्यासाठी आयोगानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.. तो निर्णय नेमका काय आहे? अवघ्या 24 तास आयोगानं दोन महत्त्वाचे निर्णय का घेतले?

Suprim Maskar

विधानसभा निवडणुकीवेळी टपाली मतदानावरून घोळ झाल्याचं आढळून आलं..मतमोजणीच्या अखेरपर्यंत टपाली मतदानावरून उमेदवार आमनेसामने उभे राहिले.. त्यानंतर व्होटचोरीच्या आरोपावरून विरोधकांनी ही निवडणुक आयोगाविरोधात एल्गार पुकारला.. त्यामुळे निवडणुक आयोगाच्य़ा पारदर्शकतेवर सातत्यानं प्रश्नचिन्ह उभे केले जात होते. अशातच टपाली मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय ईव्हीएम मतमोजणीच्या शेवटच्या दोन फेऱ्या सुरू होणार नाहीत, असा निर्णय आयोगानं घेतलाय..

टपाली मतमोजणी सुरु असल्यास ईव्हीएम मतमोजणी थांबवली जाणार, टपाली मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच ईव्हीएमच्या राहिलेल्या दोन फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण होईल. मतमोजमीची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या निर्णयामुळे टपाली मतदानाची मोजणी वेळेत आणि काटेकोरपणे पूर्ण होणार असून अंतिम निकाल जाहीर करण्यास होणारा विलंब टाळता येणार आहे...

विरोधकांनी व्होटचोरीवरून रानं उठवलेलं असताना निवडणुक आयोगानं गेल्या सहा महिन्यात ३० मोठे बदल केले आहेत. मतदारांच्या ई-पडताळणीचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या 24 तासात घेतलेला हा दुसरा महत्त्वाचा निर्णय आहे. त्यामुळे टपाली मतदानाच्या मोजणीवरून होणार वाद आता थांबणार का? आणि नवीन अॅ प तयार करून मतदार याद्यातील घोळ थांबवता येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठऱणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

SCROLL FOR NEXT