lection Commission explains voter list errors: “Duplicate and dead voters are being removed, no vote theft Saam tv
देश विदेश

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

Election Commission Press Conference: मतदार यादीतील दुहेरी नावे आणि मृत मतदारांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने दिली उत्तर. निवडणूक आयोगाने मत चोरीचे दावे फेटाळले आणि मतदार यादीतील चुकांमागील कारणे स्पष्ट केली.

Bharat Jadhav

  • मतदार यादीत डुप्लिकेट आणि मृत मतदारांची नावे असल्याच्या तक्रारी समोर आल्या.

  • राहुल गांधींनी या गोंधळाला मत चोरीचा आरोप जोडला.

  • निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून स्पष्टीकरण दिलं.

  • मतदारांनी स्वतःची नोंदणी तपासावी आणि चुका कळवाव्यात, अशी विनंती आयोगाने केली.

देशातील मतदार यादीत गडबड घोटाळा असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. काही मतदारांची नावे दोन-दोन ठिकाणी आहेत. तर मतदार यादीत काहीचा पत्ता एकच आहे. मृत मतदारांचा आकडा वाढला कसा असे प्रश्न करत राहुल गांधींनी निवडणूक आयोग मतांची चोरी करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर देशभरातून याबाबतच्या तक्रारी समोर येऊ लागल्या. दरम्यान विरोधी पक्षांकडून करण्यात ये असलेल्या मतचोरीच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत सर्व आरोपांची उत्तर दिली.

यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींवर निशाणा साधत मोठे विधान केले आहे. राहुल गांधींचे नाव न घेता त्यांनी निवडणूक आयोग आणि मतदार यादीबाबत केलेले आरोप निराधार आणि खोटे आहेत, असे म्हटलंय. जर त्यांच्याकडे त्यांच्या दाव्याचे पुरावे असतील तर त्यांना ७ दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र द्यावे, अन्यथा त्यांना संपूर्ण देशाची माफी मागावी लागेल. तसेच एका मतदारांचे नाव दोन-दोन ठिकाणी का आहेत? ते का होतंय? मृतांचा आकडा कसा वाढला याचे उत्तर मुख्य निवडणुक आयुक्तांनी दिले आहे.

एकाच मतदाराचे नाव दोन-दोन ठिकाणी कसे?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, "डुप्लिकेट EPICs दोन प्रकारे होऊ शकतात. याबाबत माहिती देताना त्यांनी दोन उदाहरणे दिली आहेत. दरम्यान असा डुप्लिकेट EPICs नंबरचा मुद्दा मार्च २०२५ च्या सुमारास चर्चेत आला होता. जेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा आम्ही त्यावर चर्चा केली.

देशभरात असे सुमारे तीन लाख लोक आढळले, ज्यांचे EPIC क्रमांक सारखेच होते, त्यामुळे त्यांचे EPIC क्रमांक बदलण्यात आलेत. हे कधी घडतं जर एक मतदार पश्चिम बंगालमध्ये राहणारी व्यक्ती आहे,. त्या व्यक्तीचा EPIC हा हरियाणामध्ये राहणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा देखील असेल.

दुसऱ्या प्रकारचा डुप्लिकेशन तेव्हा होतो जेव्हा एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार यादीत असते आणि त्याचा EPIC क्रमांक वेगळा असतो. म्हणजेच, एक व्यक्ती, अनेक EPIC क्रमांक असतात. यात असं झालं की, २००३ पूर्वी, निवडणूक आयोगाची कोणतीही वेबसाइट नव्हती.

जर मतदाराला त्यांचे नाव जुन्या ठिकाणाहून वगळायचे असेल, तर वगळता येत नव्हता. तो सर्व डेटा एकाच ठिकाणी होता. तर, २००३ पूर्वी तांत्रिक सुविधा उपलब्ध नसल्याने, असे अनेक प्रकार घडले. मागील काळात जेव्हा तांत्रिक सुविधा नव्हत्या त्यामुळे जे वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाले, त्यांची नावे अनेक ठिकाणी जोडण्यात आली.

मृतांचा आकडा कसा वाढला?

बिहार मतदार यादीवरून गोंधळ सतत वाढत आहे. अवघ्या सहा महिन्यांत लाखो मृत मतदारांची नावे समोर आली आहेत. हे सर्व कोणत्यातरी कटाचा भाग आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप लावला होता. त्यावर आता निवडमूक आयोगाने उत्तर दिलंय.

गेल्या २० वर्षात २२ लाख मृत मतदारांचे प्रत्यक्षात निधन झाले होते, परंतु त्यांची नोंद नोंदींमध्ये अद्ययावत करण्यात आली नव्हती. ही नावे आता गणनेच्या फॉर्मद्वारे समोर आली आहेत, त्यामुळे असे आकडे अचानक समोर आल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. पुढे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले, ज्ञानेश कुमार म्हणाले की, मतदार यादीत चुकीची नावे येणे ही काही नवीन गोष्ट नाही. कधीकधी एखाद्याचे नाव वगळले जाते, तर कधीकधी मृत मतदाराचे नाव काढता येत नाही. मतदार यादी परिपूर्ण करणे ही एक सामायिक जबाबदारी आहे हे त्यांनी यावेळी मान्य केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT