Election Commission: 'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Election Commission On Rahul Gandhi Allegations : मतदान चोरीच्या खोट्या आरोपांना आयोग घाबरत नाही. निवडणूक आयोगाने मतदारांना संदेश देताना म्हटले आहे की, देशातील प्रत्येक नागरिकाने मतदार बनून संविधानानुसार मतदान केले पाहिजे.
Election Commission
Chief Election Commissioner addresses press conference: Saamtv
Published On
Summary
  • राहुल गांधींच्या आरोपांना मुख्य निवडणूक आयुक्तांनी उत्तर दिलं.

  • खोट्या आरोपांना घाबरत नसल्याचं आयोगाने स्पष्ट केलं.

  • मतदारांनी संविधानानुसार मतदान करावं, असा संदेश दिला.

  • सर्व राजकीय पक्ष आयोगासाठी समान असल्याचं नमूद केलं.

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) पत्रकार परिषद घेत राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिलं. निवडणूक आयोग मत चोरीच्या खोट्या आरोपांना घाबरत नसल्याचं आगोयाकडून सांगण्यात आलंय. मतदारांना संदेश देताना निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, संविधानानुसार देशातील प्रत्येक नागरिकाने मतदार बनून मतदान केले पाहिजे. निवडणूक आयोग स्वतः राजकीय पक्षांची नोंदणी करतो, त्यामुळे आमच्यासाठी कोणताही सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष नाही, सर्व समान आहेत.

मतदार यादीतील अनियमिततेबाबत विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांवनंतर निवडणूक आयोगाने कडक भूमिका घेतलीय. आरोपांना उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, निवडणूक आयोग किंवा मतदार अशा खोट्या आरोपांना घाबरत नाही. निवडणूक आयोग निर्भयपणे आणि मतदारांशी भेदभाव न करता आणि अशा राजकारण्यांच्या कोणत्याही प्रभाव आणि भीतीशिवाय काम करत राहील.

Election Commission
Rahul Gandhi : मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधी आयोगावर कडाडले

आतापर्यंत २८३७० मतदारांनी त्यांचे दावे आणि हरकती दाखल केल्या आहेत. यासाठी १ ऑगस्ट ते १ सप्टेंबर हा कालावधी आहे. राजकीय पक्षांचे बीएलओ आणि बूथ लेव्हल एजंट (बीएलए) यांनी चुका दुरुस्त करण्यासाठी आणि प्रक्रिया पुढे नेण्यासाठी संयुक्तपणे योग्य फॉर्म भरावेत. या कामासाठी निवडणूक आयोगाचे पथके दिवसरात्र काम करत आहेत.

Election Commission
Election Commission: पुरावे मागितले तर उत्तर आलं नाही; राहुल गांधींकडून संविधानाचा अपमान: निवडणूक आयोग

राजकीय पक्षांवर निशाणा साधत ते म्हणाले की, जिल्हाध्यक्षांनी बीएलए नियुक्त केले आहेत. परंतु राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना याची माहिती नाही किंवा ते जाणूनबुजून जनतेची दिशाभूल करत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर कोणताही प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही कारण बिहारचे ७.५ कोटी मतदार आमच्यासोबत उभे आहेत.

तसेच मतदारांच्या परवानगीशिवाय त्यांचे फोटो प्रदर्शित करणे अयोग्य आहे आणि मशीन रीडेबल मतदार यादी सार्वजनिक करणे मतदारांच्या गोपनीयतेचे उल्लंघन करते, असंही निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com