eknath shinde Saam tv
देश विदेश

Eknath Shinde : भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांना चपराक; मालेगाव खटल्यावरून एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका,VIDEO

Eknath Shinde on Malegaon blast case : दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मालेगाव प्रकरणावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपींची मुक्तता झाली आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासहित ७ आरोपी निर्दोष सुटले आहेत. या प्रकरणावरील निकालाचे काहींनी स्वागत केले आहेत. तर काहींना प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांना चपराक असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ' 17 वर्ष इतका मोठा कालावधी हा निर्दोष लोकांना यातना भोगाव्या लागल्या. त्यानंतर हा निकाल लागला. १७ वर्षानंतर सत्याचा विजय झाला आहे. या लोकांना कोर्टाने निर्दोष ठरवलं. संशयावर आरोपी करता येणार नाही. तसेच शिक्षाही देण्यात येणार नाही. असा कोर्टाने निकाल दिला आहे. कोर्टाचं मनापासून अभिनंदन करतो'.

;ज्यावेळी हल्ले होत होते, त्यावेळी यूपीए सरकार होतं. मुंबईसह देशात बॉम्बस्फोट होत होते, त्यावेळी सरकारमधील मंत्री, राज्यकर्ते म्हणत होते, दहशतवादाला कोणताही रंग नसतो. कोणताही धर्म नसतो. त्याच राज्यकर्त्यांनी हा भगवा दहशतवाद असल्याचं नाव दिलं. त्यांनी लोकांची दिशाभूल केली, असे शिंदे म्हणाले.

'मतांसाठी राजकारण केलं. भगव्याला बदनाम करण्याचं काम केलं. आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम त्यांनी केलं. हे कारस्थान होतं. त्यामध्ये त्यांना गोवलं गेलं. जे लोक भगवा दहशतवाद म्हणाले,त्यांना न्यायालयाने चांगली चपराक दिली आहे. सत्याचा विजय झाला आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, असे एकनाथ शिंदे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Flood : मायबाप सरकार तुम्हीच सांगा कसं जगायचं? शेतकऱ्याचा आर्त सवाल

India vs Bangladesh: आशिया कपच्या अंतिम फेरीत भारताचा प्रवेश; अभिषेक शर्मा अन् कुलदीप समोर बांगलादेशनं नांगी टाकली

Maharashtra Flood: दर हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या; सरकार शेतकऱ्यांची मागणी मान्य करणार?

एसटी बँक नथुराम गोडसेची भक्त ? बँकेच्या वार्षिक अहवालावर झळकला फोटो

Mumbai Crime : मुंबईत दुहेरी हत्याकांड, निर्दयी मुलाकडून वडील आणि आजोबाची हत्या; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT