Maharashtra New CM Eknath Shinde Saam TV
देश विदेश

मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार घेताच एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये

महाराष्ट्र राज्य आत्महत्यामुक्त झालं पाहिजे असा संकल्प आम्ही आज कृषीदिनी करत आहोत - CM शिंदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पणजी : नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज गोवा येथील हॉटेलमधून मुंबईकडे रवाना होत असताना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,' मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेणार असून त्यासाठी आपण मुंबईकडे निघालो असल्याचं सांगितंल.

ते पुढे म्हणाले, 'अतिवृष्टीमुळे नागरिकांचं नुकसान होऊ नये यासाठी काय करता येईल याबाबतचे निर्णय घेणार आहे. अधिवेशन २ आणि ४ तारखेला बोलावलं आहे. पुढची कारवाई २ दिवसांमध्ये होईल. आज स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती आहे. आजचा दिवस आपण कृषी दिन (Agriculture Day) म्हणून साजरा करतो. शेतकरी (Farmer) संकटात येऊ नये म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणावर चांगले निर्णय घेणार आहोत.'

पाहा व्हिडीओ -

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत या प्रकारचे निर्णय घेऊ. सोबतच शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी सरकार कटीबद्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सेतकऱ्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे. महाराष्ट्र राज्य आत्महत्यामुक्त झालं पाहिजे असा संकल्प आम्ही आजच्या कृषीदिनी करत असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) हिंदुत्व आनंद दिघेंची शिकवण हिच भूमिका घेत आम्ही राज्याला पुढे घेऊन जाणार असून, राज्यातील विकास प्रकल्प देखील मार्गी लावन्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये शेतकरी हिताचे निर्णय, मेट्रो प्रकल्प, जलयुक्त शिवार प्रकल्पांचा सहभाग असल्याचं ते म्हणाले. शिवाय, जलयुक्त शिवार सारख्या प्रकल्पांमुळे जमिन सिंचनाखाली येईल असं मुख्यमंत्री म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT