ED Summons Delhi CM Arvind Kejriwal in excise policy case Saam TV
देश विदेश

Arvind Kejriwal News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचं समन्स; चौकशीला हजर राहण्याचे आदेश

ED Summons CM Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने समन्स बजावलं आहे. येत्या २ नोव्हेंबर रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे.

Satish Daud

ED Summons CM Arvind Kejriwal

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने समन्स बजावलं आहे. येत्या २ नोव्हेंबर रोजी ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. दिल्लीतील अबकारी धोरण आणि मद्यविक्री घोटाळा प्रकरणात ईडीकडून हे समन्स बजावण्यात आलं आहे. याआधी देखील सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणेनं अरविंद केजरीवाल यांची चौकशी केली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्लीतील अबकारी धोरण आणि मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने चौकशी सुरू केली आहे. अगदी वर्षभरापूर्वी या प्रकरणात ईडीने माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक केली होती. त्यानंतर खासदार संजय सिंह यांना देखील ईडीने ताब्यात घेतलं होतं. (Latest Marathi News)

दरम्यान, ईडीने आता आपला मोर्चा मुख्यमंत्र्यांकडे वळवला असल्याचं दिसून येत आहे. केजरीवाल यांना चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने सांगितलं आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीचं समन्स बजावल्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते सौरभ भारद्वाज यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

कुठल्याही किंमतीत आम आदमी पक्षाला संपवणे हेच केंद्र सरकारचं उदिष्ट आहे, असं भारद्वाज यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करुन त्यांना भाजपचा तुरुंगात पाठवण्याचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप देखील सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने २०२०-२१ साली मद्य धोरणात बदल केला होता. या धोरणात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता. काही ठराविक कंत्राटदारांनाच यामध्ये फायदा झाला. संबंधित विभागाच्या संमती न घेताच लायसन्स फीमध्ये सवलत दिली आहे, असंही भाजप नेत्यांनी म्हटलं होतं. यानंतर सीबीआय आणि ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT