ED summons Actor Prakash Raj in 100 crore ponzi scam linked to Pranav Jewellers  Saam TV
देश विदेश

ED summons To Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांना ईडीने बजावलं समन्स, 100 कोटींच्या पॉन्झी घोटाळ्याशी काय आहे कनेक्शन?

Prakash Raj News : अभिनेते प्रकाश राज यांना ईडीने बजावलं समन्स, 100 कोटींच्या पॉन्झी घोटाळ्याशी काय आहे कनेक्शन?

Satish Kengar

ED summons Actor Prakash Raj in 100 crore ponzi scam linked to Pranav Jewellers :

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अभिनेते प्रकाश राज यांना समन्स बजावले आहे. तामिळनाडूतील त्रिची येथील एका दागिन्यांच्या समूहाविरुद्ध पॉन्झी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी त्यांना ईडीने समन्स बजावले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

त्यांनी सांगितले की, 100 कोटी रुपयांच्या कथित पॉन्झी योजना प्रकरणात अभिनेता प्रकाश राज यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अलीकडेच, ईडीने 20 नोव्हेंबर रोजी प्रणव ज्वेलर्स या त्रिची येथील भागीदारी संस्थेच्या मालमत्तांची प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार झडती घेतली होती. यानंतर प्रकाश राज यांना ईडीकडून समन्स प्राप्त झाले आहे. ईडीने टाकलेल्या या छाप्यात 23.70 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड आणि 11.60 किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.  (Latest Marathi News)

ईडी सूत्रांनी सांगितलं की, प्रकाश राज यांना चौकशीसाठी बोलावणं हा प्रणव ज्वेलर्सने सुरू केलेल्या कथित बनावट सोने गुंतवणूक योजनेच्या तपासाचा भाग आहे. प्रकाश राज या कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. त्यांना पुढील आठवड्यात चेन्नईतील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दरम्यान, पॉन्झी योजना प्रणव ज्वेलर्सद्वारे चालवली जात असल्याचा आरोप आहे. कथित आर्थिक अनियमिततांमध्ये गुंतलेल्या इतरांविरुद्ध त्रिची येथील आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ही योजना ईडीच्या अधिकाराखाली आली आहे. आर्थिक गुन्हे शाखाच्या म्हणण्यानुसार, प्रणव ज्वेलर्सने आकर्षक परताव्याचे प्रलोभन दाखवून सोने गुंतवणूक योजनेच्या बहाण्याने लोकांकडून 100 कोटी रुपये गोळा केले. मात्र कंपनीने सांगितल्याप्रमाणे काही झालं नाही, उलट गुंतवणूकदारांचे पैसे यात अडकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार? सरकार उद्योग अन् रोजगारावर भर देणार?

India vs New Zealand T20: भारताचा टी२० मालिकेत धमाकेदार विजय, इशान आणि अर्शदीप ठरले स्टार, न्यूझीलंडला ४-१ने लोळवलं

T20 फॉर्मेटचा नवा राजा! 3000 धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला; सूर्यकुमार फटकेबाजीचा बादशहा बनला

Iran Blast: इराणमध्ये मोठा स्फोट; ८ मजली निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली, संपूर्ण देशात खळबळ

दादांनी दूर ठेवलेले मुंडे, प्रकृतीमुळे बाजूला असलेले भुजबळ आता आघाडीवर, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT