MP Crime News 
देश विदेश

Crime News: ईडी कंपनीच्या गेटवर पोहोचताच, कंपनीच्या मालकीणीने घेतलं विष, ७३ कोटींचा आरोप

जयश्री गायत्री फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांच्या ठिकाणी छापे टाकल्यानंतर, ईडीला ७३ कोटी रुपयांची मालमत्ता सापडली. कारवाईदरम्यान, कंपनी मालकाची पत्नी पायल मोदीने विष प्राशन केलं, त्यानंतर उपचार सुरू आहेत.

Dhanshri Shintre

जयश्री गायत्री फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर ईडीने छापा टाकल्यानंतर, कंपनीचे संचालक किशन मोदी यांची पत्नी, ३१ वर्षीय पायल मोदी हिने विष प्राशन केलं. गुरुवारी रात्री गंभीर अवस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आत्महत्येचा प्रयत्न का केला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. पायलने कथित सुसाईड नोट सोडली असून, त्यात केंद्रीय मंत्री चिराग पासवानसह पाच अन्य व्यक्तींवर आरोप केले आहेत. पोलिसांनी सुसाईड नोटची पडताळणी सुरू केली असून, पुढील तपास सुरु आहे.

बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जयश्री गायत्री फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या विविध परिसरांमध्ये झडती घेतली. भोपाळ, सीहोर आणि मुरैना येथील कंपनीच्या परिसरात दोन दिवस चाललेल्या शोधात, ईडीने कंपनीच्या ऑपरेटर्सकडून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सापडली आहे. यामुळे कंपनीच्या वित्तीय स्थिती आणि संबंधित घटकांबाबत आणखी तपास सुरू करण्यात आला आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जयश्री गायत्री फूड प्रोडक्ट्स कंपनीच्या परिसरात केलेल्या छाप्याच्या दुसऱ्या दिवशी, कंपनीचे मालक किशन मोदी यांची पत्नी पायल मोदी हिने विष प्राशन केले. तिला गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत. ईडीने कंपनी आणि ऑपरेटरच्या ठिकाणी केलेल्या तपासामध्ये अनेक महत्वाची कागदपत्रे, २५ लाख रुपये रोख रक्कम, आलिशान बीएमडब्ल्यू आणि फॉर्च्युनर कार्स, तसेच विविध कंपन्या आणि कुटुंबीयांच्या नावे ६६ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली. याशिवाय, ईडीला किशन मोदीशी संबंधित कागदपत्रे आणि ६.२६ कोटी रुपयांची एफडीही मिळाली आहे.

पायल मोदीच्या कथित सुसाईड नोटमध्ये केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि त्यांचे पाच सहकारी यांचा उल्लेख केला आहे. यामध्ये चंद्र प्रकाश पांडे, वेद प्रकाश पांडे, सुनील त्रिपाठी, भगवान सिंग मेवाडा आणि हितेश पंजाबी यांचे नाव समाविष्ट आहे. नोटमध्ये आरोप आहे की, हे सर्व लोक मोदींच्या कंपन्यांवर CGST, FFSI, EOW आणि ED चा छापा टाकण्यासाठी चिराग पासवान यांच्या राजकीय प्रभावाचा गैरवापर करत होते. यामुळे पायल मोदीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gajkesari Rajyog: 12 वर्षांनंतर बनणार गजकेसरी राजयोग; चंद्र-गुरूच्या कृपेने मिळणार भरघोस पैसा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर जाणार? महत्त्वाची अपडेट समोर

Accident : संभाजीनगरात भयंकर अपघात, बापाच्या डोळ्यासमोर दोन्ही लेकरांचा मृत्यू, मुलीला पाहून धाय मोकलून रडले

Maharashtra Live News Update : शिरुर नगरपरिषदेत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला, महिला उमेदवार मैदानात

Lonavala Mega Block: मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील १० दिवस मेगा ब्लॉक; VIDEO

SCROLL FOR NEXT