ED seizes ₹110 crore and 1200 credit cards in ₹3,000 crore Parimatch betting scam raids across India Saam TV News Marathi
देश विदेश

Money Laundering Probe : ३,००० कोटींच्या प्रकरणात ईडीची धाड, मुंबईसह देशभरात १७ ठिकाणी छापे, ११० कोटी रुपये जप्त

17 locations raided by ED in money laundering probe : ईडीने मुंबईसह देशभरातील १७ ठिकाणी छापेमारी केली. या प्रकरणात ईडीने तब्बल ११० कोटी रुपये जप्त केले आणि बँक खाती गोठवली. पॅरिमॅच हे बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म असून, त्याद्वारे ३,००० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

  • ईडीने देशभरात १७ ठिकाणी छापेमारी करून ३,००० कोटींच्या पॅरिमॅच प्रकरणाचा तपास केला.

  • ११० कोटी रुपये जप्त, बँक खाती गोठवली आणि डिजिटल पुरावे मिळाले.

  • १,२०० हून अधिक क्रेडिट कार्ड्स ईडीच्या हाती लागली.

  • पॅरिमॅचने बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंगद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती.

ED raid in ₹3,000 crore Parimatch online betting scam : अंमलबजावणी संचालनालयाने मागील दोन दिवसांत देशभरात १७ ठिकाणी छापेमारी केली आहे. मनी लाँड्रिंगच्या चौकशीसंदर्भात ईडीने मुंबईसह देशभरातील १७ ठिकाणी छापे टाकले. ३०० कोटींच्या बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म पॅरीमॅचच्या प्रकरणात ईडीकडून चौकशी आणि छापमेरी सुरू आहे. याप्रकरणी ईडीने मुंबई, दिल्ली, नोएडा, जयपूर, सुरत, मदुराई, कानपूर आणि हैदराबाद येथे छापे टाकण्यात आले.

३०० कोटींच्या ऑनलाइन बेटिंग प्रकरणात ईडीने देशभरात १७ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये ईडीने तब्बल ११० कोटी रूपयांसह बँक खाती जप्त केली आणि गोठवली आहेत. त्याशिवाय या प्रकरणात ईडीला कागदपत्रे आणि डिजिटल साहित्य मिळाले आहे. ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म Parimatch कडून युजर्सला फसवल्याबद्दल ईडीकडून कारवाई झाली. Parimatch.com विरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीकडून ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरात गुंतवणूकदारांची तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.

ईडीच्या छापेमारीत देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पुरावे मिळाले आहेत. त्यामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पॅरिमॅचने देशभरात वेगवेगळ्या धोरणांचा वापर करून पैसे खात्यांद्वारे वळवले. एका प्रकरणात, वापरकर्त्यांनी खात्यांमध्ये जमा केलेले पैसे तामिळनाडूमधील एका विशिष्ट परिसरात रोख स्वरूपात काढले गेले. ही रोकड हवाला ऑपरेटरना देण्यात आली, त्यानंतर ही रक्कम यूके-स्थित कंपनीचे व्हर्च्युअल वॉलेट रिचार्ज करण्यासाठी वापरली.

छापेमारीदरम्यान एका ठिकाणी ईडीला १,२०० हून अधिक क्रेडिट कार्ड सापडली आणि जप्त करण्यात आली. ज्या पेमेंट कंपन्यांचे पेमेंट अ‍ॅग्रीगेटर परवान्यांसाठीचे अर्ज आरबीआयने नाकारले होते, त्यांनी टीएसपीच्या नावाखाली पॅरिमॅचला त्यांच्या सेवा दिल्याचेही समोर आलेय. यूपीआय ट्रान्सफरद्वारे गोळा केलेले पैसे ई-कॉमर्स रिफंड, चार्जबॅक, व्हेंडर पेमेंट इत्यादींच्या नावाखाली गुंतवले गेले आणि हस्तांतरित केले. त्यामुळे निधीची माहिती सपवण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Ujjawala Yojana: पीएम उज्जवला योजनेत मिळतात मोफत गॅस सिलेंडर; आवश्यक कागदपत्रे आणि अर्जप्रक्रिया घ्या जाणून

Malaika Arora : मलायका अरोरा झाली मालामाल; विकलं मुंबईतील आलिशान अपार्टमेंट, नफा वाचून बसेल धक्का

Maharashtra Live News Update: आरक्षणासंदर्भात ओबीसी समाजाचे नेते आणि वकील महासंघाची महत्वाची बैठक

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT