Delhi Liquor Case News Update :
आम आदमी पक्षाच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने आता दिल्ली सरकारमधील आणखी एका मंत्र्यांला ईडीने समन्स पाठवलं आहे. ईडीने आता मंत्री कैलाश गहलोत यांना समन्स पाठवलं आहे, असं वृत्त 'एएनआय' वृत्तसंस्थेने दिलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीन २१ मार्चला अटक केली. त्यानंतर ईडीने मंत्री कैलाश गहलोत यांना समन्स धाडलं आहे. यामुळे कैलाश गहलोत यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.
गहलोत हे नजफगढ मतदारसंघातील आमदार आहेत. त्यांच्यावर मद्य विक्री धोरणाचा मसुदा तयार केल्याचा आरोप आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, ईडीने समन्स पाठवत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. या प्रकरणात त्यांचा जबाब नोंदविण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, मद्य विक्री धोरणात अरविंद केजरीवाल यांना २ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. याआधी ईडीने दिल्लीच्या एका कोर्टाने केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती.
दरम्यान, दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांच्या व्यतिरिक्त माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, माजी मंत्री सत्येंद्र जैन आणि राज्यसभा खासदार संजय सिंह हे सध्या अटकेत आहेत.
दरम्यान, दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांना आज सकाळी ११ वाजता ईडी चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार, ते ईडी कार्यालयात पोहोचल्याची माहिती मिळत आहे. आता ईडी चौकशीनंतर मंत्री कैलाश गेहलोत काय प्रतिक्रिया देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.