राज्याच्या राजकारणात खळबळ; साताऱ्यात भाजपच्या माजी मंत्र्यांना अटक

Satara Political News: साताऱ्यात भाजपच्या माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने राज्यात खळबळ उडाली आहे.

सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. साताऱ्यात राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना अटक करण्यात आली आहे. कराडमधील यशवंत बँकेत ११२ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे .चरेगावकर हे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. सातारा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. राज्यमंत्री दर्जाचं पद भूषवलेले शेखर चरेगावकर यांना अटक केल्याने साताऱ्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com