Arvind Kejriwal News Update saam tv
देश विदेश

ED News: पाच समन्स बजावूनही केजरीवाल हजर झाले नाहीत, ईडीची कोर्टात धाव

Arvind Kejriwal: कथित दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जारी केलेल्या समन्सचे पालन न केल्याबद्दल ईडीने अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

Satish Kengar

Arvind Kejriwal News :

कथित दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जारी केलेल्या समन्सचे पालन न केल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. केजरीवाल यांच्याविरोधात ईडीने आतापर्यंत 5 समन्स जारी केले आहेत. मात्र त्यांनी एकदाही ईडीला चौकशीसाठी वेळ दिला नाही.

शनिवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने याच प्रकरणी ईडीचा युक्तिवाद ऐकला. उर्वरित युक्तिवाद विचारात घेण्यासाठी 7 फेब्रुवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केजरीवाल यांना आता दुहेरी धक्का बसू शकतो. दिल्ली क्राइम ब्रँच आणि ईडी या दोघांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणात केजरीवाल यांना नोटीस बजावली आहे. शुक्रवारी दिल्ली क्राइम ब्रँच पथक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांना नोटीस देण्यासाठी पोहोचले होते. मात्र त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला. यानंतर दिल्ली क्राइम ब्रँच पथक माघारी परतले. (Latest Marathi News)

दरम्यान, ईडीने केजरीवाल यांच्याविरोधात 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर, 3 जानेवारी, 19 जानेवारी आणि 2 फेब्रुवारी रोजी समन्स जारी केले आहेत. केजरीवाल यांना बुधवारी केंद्रीय संस्थेने पाचव्यांदा समन्स बजावले. समन्सला बेकायदेशीर सांगत आम आदमी पक्षाने सांगितले की, अंमलबजावणी संचालनालय केजरीवाल यांना अटक करण्यासाठी वारंवार नोटीस पाठवत आहे.

केरीवाल सरकारवर आरोप आहेत की, मद्य व्यापाऱ्यांना परवाने देण्याबाबत दिल्ली सरकारच्या 2021-22 च्या उत्पादन शुल्क धोरणामुळे काही मद्य व्यापाऱ्यांना फायदा झाला. ज्यांनी यासाठी लाच दिली होती. मात्र, आम आदमी पक्षाने हे आरोप वारंवार फेटाळून लावले आहेत. नंतर हे धोरण मागे घेण्यात आले आणि दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) करण्याची शिफारस केली होती. यानंतर ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा दाखल केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक ; उद्धव ठाकरेंनी दिला कानमंत्र

Shrirampur Vidhan Sabha : श्रीरामपूरमध्ये महायुतीचा पेच कायम; शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांचे अर्ज कायम

Bus Accident : दोन बसचा समोरासमोर अपघात; २५ प्रवासी जखमी, कन्नड- चाळीसगाव बायपास रोडवरील घटना

Nashik News : दिवाळीनिमित्त परिवार बाहेरगावी; बांधकाम व्यवसायिकाच्या घरी २२ लाखांची चोरी

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

SCROLL FOR NEXT