Ebola Threat Nears India saam tv
देश विदेश

Ebola Alert: भारतात 'इबोला'ची एन्ट्री? दिल्ली विमानतळावर हाय अलर्ट, सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

Ebola Threat Nears India: आफ्रिकन देशांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या प्राणघातक 'इबोला' विषाणूचा धोका आता भारताच्या सीमेवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे भारतामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Priya More

भारतात इबोला हाय अलर्ट
दिल्ली विमानतळ इबोला तपासणी
WHO इबोला आंतरराष्ट्रीय आणीबाणी
आफ्रिकन देशांसाठी प्रवासाच्या सूचना

इबोलाच्या उद्रेकानंतर WHOनं आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केलीय. अशातच आता केंद्र सरकार सतर्क झालं असून देशात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे या हाय अलर्टमध्ये प्रवाशांसाठी काय नियम करण्यात आलेत. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

आफ्रिकन देशांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या प्राणघातक 'इबोला' विषाणूचा धोका आता भारताच्या सीमेवर येऊन ठेपलाय. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोला उद्रेकाला आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर, केंद्र सरकारनं देशभरात हाय अलर्ट जारी केलाय. भारतात अद्याप इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नसला, तरी विमानतळांपासून ते रुग्णालयांपर्यंत सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

दिल्ली विमानतळावर प्रवाशांसाठी 'हेल्थ अलर्ट' जारी केलाय. आफ्रिकन देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष नजर ठेवली जातेय. इबोलाबाधित देशांतून येणाऱ्या प्रवाशांची कसून चौकशी होणार असून त्यांना इमिग्रेशनपूर्वी आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आलीय..तसचं ताप, थकवा असल्यास त्वरित आरोग्य यंत्रणांना कळवण्याचं आवाहन प्रशासनानं केलयं.

दरम्यान इबोलामुळे देशात लॉकडाऊन लागण्याची भीती व्यक्त केली जातेय. मात्र इबोला व्हायरसची लक्षणं दिसत असल्यानं लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती येणार नाही, असं विधान आरोग्य तज्ज्ञांनी केलयं. दुसरीकडे फक्त दिल्लीच नाही, तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्र सरकारसह सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय. मुंबई विमानतळावरही यंत्रणा अलर्ट मोडवर असून संशयित रुग्ण आढळल्यास आरोग्य यंत्रणांना तयारी करण्यासाठी निर्देशही देण्यात आलेत.

सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये संशयित रुग्णांसाठी तात्काळ आयसोलेशन वॉर्ड तयार ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर पीपीई किट्स, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आणि स्वतंत्र रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्याचेही निर्देश आहेत.. तसचं आफ्रिकन देशांचा प्रवास करून आलेल्या नागरिकांची ट्रॅव्हल हिस्ट्री ट्रॅक करण्याचेही आदेश आहे. इबोला चाचणीसाठी प्रयोगशाळांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत..बाधित रुग्णांना 21 दिवसांसाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानचा प्रवास टाळण्याचा सल्लाही सरकारनं भारतीय नागरिकांना दिलाय..तसंच देशात इबोलाचा शिरकाव होऊ नये यासाठी नागरिकांनीही पूर्ण सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठ्यांच्या लेकरांचे कल्याण ह्वावे असे नेत्यांनी बोलावे - मनोज जरांगे

Rishabh Pant : आयपीएल विश्वात खळबळ!ऋषभ पंतनं अचानक घेतला मोठा निर्णय, LSG चे कर्णधारपद सोडलं

Crime News: मानवतेला काळिमा! पहाटे दोघांनी गार्डनमध्ये नेलं अन्...; 61 वर्षीय मानसिकदृष्ट्या दिव्यांग महिलेसोबत पाशवी कृत्य

कर्नाटकातील राजकारणात अचानक ट्विस्ट; डीके शिवकुमार यांच्या वक्तव्यानं मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स वाढला

दिसतेय जणू अप्सरा, श्रिया पिळगावकरच्या सौंदर्यावर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

SCROLL FOR NEXT