Afghanistan Earthquake Saam TV
देश विदेश

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान पुन्हा शक्तिशाली भूकंपाने हादरला, 6.1 रिश्टर स्केलचे तीव्र झटके जाणवले

Afghanistan Earthquake News : हेरात प्रांताच्या राजधानीपासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर हा भूकंप आला.

प्रविण वाकचौरे

Afghanistan Earthquake :

अफगाणिस्तान चार दिवसांनंतर पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंपाने हादरला आहे. आज म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी पहाटे अफगाणिस्तानच्या वायव्य भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आहे. हेरात प्रांताच्या राजधानीपासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर हा भूकंप आला.

चार दिवसांपूर्वी म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत 3 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मोठी वित्तहानी देखील याठिकाणी झाली होती. अफगाणिस्तानातील हा भूकंप दोन दशकांतील सर्वात भीषण भूकंप असल्याचे तालिबानचे म्हणणे आहे. (Latest News)

हेरात हे अफगाणिस्तानातील मोठ्या शहरांपैकी एक आहे. शनिवारी झालेल्या भूकंपानंतर मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती. त्यावेळी भूकंपाचा केंद्रबिंदू हेरातच्या वायव्येस 40 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान आज पुन्हा एकदा भूकंप झाल्याने नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.

तालिबानचे प्रवक्ते अब्दुल वाहिद रायन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत. शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. 1,240 लोक जखमी झाले आहेत आणि 1,320 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boat accident: समुद्रात नाव उलटली, १५ मुलांसह १३९ जणांचा मृत्यू; ११६ जण बेपत्ता

Maharashtra News Live Update: पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

SCROLL FOR NEXT