earthquake struck the bali sea region of indonesia magnitude 7 on richter scale  saam TV
देश विदेश

Indonesia Earthquake: इंडोनेशियात जोरदार भूकंपाचे धक्के; लोक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळाले, शेकडो घरांना तडे

Indonesia Earthquake News: इंडोनेशियातील बाली सागर भागात मंगळवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 7.0 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली.

Satish Daud

Indonesia Earthquake Latest News: इंडोनेशियातील बाली सागर भागात मंगळवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 7.0 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली. रॉयटर्सने युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजी सेंटर (EMSC) च्या हवाल्याने ही माहिती दिली. हा भूकंप इतका जोरदार होता, घरातील वस्तूंची पडझड झाली. त्यामुळे अनेक लोक घरातून बाहेर पळत आले. (Latest Marathi News)

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या आकडेवारीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू इंडोनेशियाच्या (Indonesia) मातारमच्या उत्तरेस 201 किलोमीटर आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 518 किलोमीटर (322 मैल) खाली होता. सध्या भूकंपानंतर सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. त्याचबरोबर यामध्ये कुठलीही जीवित झाली नाही, मात्र शेकडो घरांना तडे गेल्याचं वृत्त आहे.

याआधी सोमवारी छत्तीसगडच्या उत्तरेकडील सुरगुजा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या घटनेत अद्याप कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरगुजा जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अंबिकापूर शहराजवळ सायंकाळी उशिरा दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले.

पहिला धक्का रात्री उशिरा 8.40 वाजता जाणवला. याचा केंद्रबिंदू अंबिकापूरपासून नऊ किलोमीटर अंतरावर पृष्ठभागापासून सुमारे 10 किलोमीटर खाली होता. त्याची तीव्रता 3.8 इतकी मोजली गेली. त्याबरोबर रात्री ८.२६ वाजता भूकंपाचा दुसरा धक्का जाणवला. याची तीव्रता 3.9 तीव्रता मोजली गेली. त्याचा केंद्रबिंदू अंबिकापूर शहरापासून 10 किमी पूर्वेस सुमारे 11 किमी खोलीवर होता.

दोन्ही भूकंप कमी तीव्रतेचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. ५.६ रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर हजारो लोक जखमी झाले होते.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माढामध्ये शरद पवार गटाचे अभिजित पाटील यांचा विजय

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT