Earthquake  saam TV
देश विदेश

Earthquake in Indonesia: इंडोनेशियामध्ये भूकंपाचे हादरे, तीव्रता 6.1 रिश्टर स्केल

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ इतकी मोजली गेली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Earthquake in Indonesia: इंडोनेशिया आज मोठ्या भूकंपाने हादरला आहे. सोमवारी पहाटे भारतीय वेळेनुसार पहाटे ३.५९ वाजता इंडोनेशियातील उत्तर सुमात्रा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपाची पुष्टी केली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ इतकी मोजली गेली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती नाही. मात्र, भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोकांमध्ये भीती पसरली होती. लोक घरातून बाहेर पडले आणि सुरक्षित स्थळी धावले.

भूकंपाचे जोरदार धक्के असूनही, इंडोनेशियात त्सुनामीचा कोणताही इशारा दिलेला नाही. इंडोनेशिया हा 27 कोटींहून अधिक लोकसंख्या 'रिंग ऑफ फायर' वर बसलेली आहे. येथील बराचसा भाग ज्वालामुखी आणि फॉल्ट लाइन्समुळे वारंवार भूकंप आणि ज्वालामुखीच्या उद्रेकाने प्रभावित होतो.

यापूर्वी १० जानेवारी (मंगळवार) रोजी इंडोनेशियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.७ इतकी नोंदवण्यात आली. युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने (EMSC)ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटलं होतं की, मंगळवारी इंडोनेशियाच्या तनिंबर भागात ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला. EMSC नुसार, भूकंप पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ९७ किमी खाली होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: पैशांची बरसात अन् घरात आनंद! रविवारचा 'या' ५ राशींसाठी घेऊन येणार मोठी खुशखबर

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

SCROLL FOR NEXT