Joshimath News : जोशीमठात आणखी दोन हॉटेल्स धोकादायकरित्या झुकले; परिसरातील नागरिकांच्या मनात धडकी कायम

जोशीमठाच्या भागात राहण्याऱ्यांचा धोका अद्याप टळला नाही.
file photo
file photoSaam Tv

Joshimath Hotel Latest News : जोशीमठाची जमीन दिवसेंदिवस खचत चालली आहे. जोशीमठाच्या भागात राहण्याऱ्यांचा धोका अद्याप टळला नाही. भूस्खलनग्रस्त जोशीमठमध्ये आणखी दोन हॉटेल्सना तडे गेले आहेत. धोकादायकरीत्या हॉटेल्स झुकल्याने पुन्हा भीतीचे वातावरण परिसरात पसरले आहे. (Latest Marathi News)

file photo
Joshimath Sinking Live Updates : इस्त्रोचे धोकादायक संकेत! संपूर्ण पवित्र जोशीमठ शहरंच उध्वस्त होणार?

भूस्खलनग्रस्त जोशीमठमध्ये आणखी दोन हॉटेल्स धोकादायकरित्या झुकले आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावारण पसरले आहते. औली रोपवेजवळ आणि जोशीमठच्या इतर भागांमध्ये इमारतींना आणखी मोठे तडे गेले आहेत.

तडे गेलेल्या घरांची संख्या वाढून ८२६ झाली असून त्यापैकी १६५ घरे ‘असुरक्षित भागात आहेत. आतापर्यंत २३३ कुटुंबांना तात्पुरत्या मदत केंद्रांमध्ये हलवण्यात आलं आहे.

जोशीमठावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

सर्वोच्च न्यायालय आज जोशीमठाच्या (Joshimath) संदर्भात स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. जोशीमठाची जमीन गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खचत आहे. इथल्या अनेक घरांना तडे गेले आहेत. त्यामुळं अनेक लोकांना राहतं घर सोडून जावं लागत आहे.

file photo
Uttarakhand News: जोशीमठ भूस्खलन क्षेत्र म्हणून घोषित; उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधानांनी दिल्या 'या' सूचना

त्यामुळं स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी जोशीमठ संकट हे राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर सरन्यायाधीश डीवाई चंद्रचूड, न्यायमुर्ती पीएस नरसिम्हा आणि न्यायमुर्ती जेबी पारडीवाला यांचं खंडपीठ फैसला देणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com