Earthquake News Saam Tv
देश विदेश

Earthquake News: तैवानंतर न्यूयॉर्क आणि जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के; इमारती हादरल्या

Earthquake In Jammu Kashmir And New York: तैवानंतर न्यूयॉर्क आणि जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नागरिक जीव वाचविण्यासाठी घराच्या बाहेर पडले होते.

Rohini Gudaghe

Earthquake In kishtwar Earthquake Hits New York

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये शुक्रवारी (५ एप्रिल) रात्री ११.०१ वाजता पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल असल्याचं सांगण्यात येत आहे. (Earthquake In Jammu Kashmir) भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिक त्यांचा जीव वाचविण्यासाठी घराबाहेर पडले होते. किश्तवाडमध्येही शुक्रवारी सकाळी देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते.  (Latest Marathi News)

किश्तवाडमध्ये दिवसातून दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकं घराबाहेर पडले. मात्र, भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड आणि डोडामध्ये शुक्रवारी सकाळी भूकंपाचे धक्के (Earthquake Hits New York) जाणवले आहेत. याआधी गुरुवारी हिमाचलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील अनेक भागात शुक्रवारी (५ एप्रिल) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ इतकी मोजली गेली (Earthquake In kishtwar) आहे. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, त्यामुळे न्यूयॉर्कमधील अनेक इमारती हादरू लागल्या, अशी माहिती मिळत आहे. ज्या भागात भूकंपाचे धक्के बसले, त्या क्षेत्रात भूकंप क्वचित येतो, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे या भूकंपाला दुर्मिळ भूकंप म्हटलं जात आहे. न्यू जर्सी आणि न्यूयॉर्क शहरामध्ये अचानक हादरे बसु लागले. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितलं की, भूकंपाचा केंद्रबिंदू न्यू जर्सीजवळील लेबनॉन येथे होता. मात्र भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांना भूकंपाची माहिती (Earthquake) देण्यात आली. त्यांचे प्रवक्ते फॅबियन लेव्ही यांनी सांगितलं की, आम्हाला यावेळी कोणतीही मोठी नुकसान झाल्याचं वृत्त मिळालेलं नाही. आम्ही अद्याप भूकंपाच्या परिस्थितीचे मूल्यांकन करत आहोत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रुकलिनच्या लोकांनी मोठा आवाज ऐकला होता. त्यांनी इमारत हादरत असल्याचं सांगितलं होतं. बाल्टिमोर, फिलाडेल्फिया, कनेक्टिकट आणि पूर्व किनाऱ्यावरील इतर भागातील (Earthquake News) लोकांनीही जमिनीचा थरकाप जाणवत असल्याचं सांगितलं. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी x वरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, संपूर्ण राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले. होचुल यांनी सांगितलं की, त्यांची टीम भूकंपाचे परिणाम आणि झालेल्या नुकसानीचं मूल्यांकन करत आहे.

यापूर्वी २३ ऑगस्ट २०११ रोजी ५.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाने जॉर्जियापासून (Earthquake Update) कॅनडापर्यंत लाखो लोकांना हादरवून सोडलं होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व किनारपट्टी भागात आलेला हा सर्वात शक्तिशाली भूकंप होता. त्या भूकंपामुळे वॉशिंग्टन स्मारकाला तडे गेले होते. व्हाईट हाऊस आणि कॅपिटल रिकामे करावं लागलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chalisgaon News : निकालापूर्वी चाळीसगावात झळकले विजयाचे बॅनर; आमदार चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT