Earthquake Saam tV
देश विदेश

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यात भूकंपाचे धक्के, पाकिस्तानात होतं केंद्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भारतासह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवलेत. पाकिस्तानमधील वृत्त द ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार, खैबर पख्तूनख्वापासून ते पंजाबपर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवलेत. या भूकंपाची तीव्रता रेश्क्टर स्केल ५.७ नोंदवली गेली.

या भूकंपाचे केंद्र डेरा गाझी खान जवळ असून जमिनीखाली १० किलोमीटर खोल होते. यामुळे भुपृष्ठभागावर याची तीव्रता कमी जाणवली. भारत, पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानसह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे कोणत्याच प्रकारची जीवितहानी झाली नाहीये.

या भूकंपाचे धक्के भारतातील उत्तर भागातील अनेक राज्यात जाणवले. दिल्ली, पश्चिम यूपी, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि पंजाबसह अनेक राज्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली, पश्चिम यूपी, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि पंजाबसह अनेक राज्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सेसमोलॉजीनुसार भूकंप १२.५८ मिनिटांनी आला होता.

सेंटर फॉर सेसमोलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता ६ पेक्षा कमी असेल तर तो भूकंप धोकेदायक नसतो. परंतु या भूकंपाचं केंद्र जमिनीच्या जास्त खाली नव्हतं, त्यामुळे या भूकंपामुळे अधिक हानी होण्याची शक्यता होती. अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाची तीव्रता ५.८ नव्हते तर ५.४ इतकी तीव्रता होती.

त्यानुसार पाकिस्तानमधील पंजाब राज्यात एकापेक्षा जास्त शहरात याचे धक्के जाणवले. यात मियांवली, खानेवाल, टोबा टेक सिंह, गुजरात, सरगोधा आणि झांग या शहराचा समावेश आहे. यासह इस्लामाबाद, मुल्तान आणि लाहौरमध्येही भूकंपाचे झटके जाणवले. तर खैबर पख्तूनख्वाच्या पेशावरसह स्वात घाटी, उत्तरी वझिरिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवलेत. वृत्तानुसार, २९ ऑगस्टलाही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचं केंद्र अफगाणिस्तानमध्ये आढळून आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शरद पवार गटाकडे 1652 इच्छुकांचे अर्ज, देवळालीतून 62 सर्वाधिक इच्छुक

NABARD Recruitment 2024 : १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ३५ हजर रुपये पगार अन् बँकेत नोकरी, आजच अर्ज करा

Mumbai News: केंद्रात, राज्यात तुमचे सरकार, छत्रपतींचे स्मारक का उभारले नाही? संभाजीराजे संतापले; मुंबईत हायहोल्टेज ड्रामा

Beed Crime : ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; फरार शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

Bigg Boss Grand Finale : 'तौबा-तौबा' अन् 'झापुक झुपूक'ची रंगणार जुगलबंदी; अभिजीत-सूरजचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT