Andaman Nicobar Earthquake News in Marathi SAAM TV
देश विदेश

Andaman Nicobar Earthquake: अंदमान-निकोबारमध्ये भल्यापहाटे भूकंपाचे धक्के; लोक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळाले

Satish Daud

Andaman Nicobar Earthquake News: मागील काही दिवसांपासून देशातील विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्ली-एनसीआरच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. आज म्हणजेच शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अंदमान निकोबार बेटांवर आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी होती.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. एनआय वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे. अचानक भूकंपाचे तीव्र धक्के बसताच नागरिक घाबरून गेले. जमीन हादरल्याने घरातील भांड्यांची पडझड झाली.

त्यामुळे गाढ झोपेत असलेले नागरिक जीवमुठीत घेऊन घराच्या बाहेर पळाले. यावेळी अनेकांनी रस्त्यावरच आसरा घेतला. सतत भूकंपाचे धक्के बसत असल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंता दिसत होती. बराच काळ या लोकांनी कुटुंबकबिल्यासह रस्त्यावर काढला.

त्यानंतर भूकंपाचा पुन्हा धक्का बसला नसल्याचं लक्षात आल्यानंतर लोक आपआपल्या घरात गेले. विशेष बाब म्हणजे याआधी 7 ऑगस्ट रोजी अंदमान आणि निकोबार बेटांमधील दिगलीपूरच्या उत्तरेला 150 किमी अंतरावर 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

एनसीएसनुसार, या भूकंपाची खोली 10 किमी इतकी नोंदवण्यात आली होती. त्याआधी सुद्धा 3 ऑगस्ट रोजी पहाटे अंदमान निकोबार बेटांवर 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. आता पुन्हा एकदा शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

भूकंप कसा होतो?

जमिनीच्या आत होणाऱ्या हालचालींमुळे होणाऱ्या कंपनांमुळे होणारी स्थिती म्हणजे भूकंप असे म्हटता येईल. भूगर्भशास्त्रानुसार, पृथ्वी १२ टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्स अतिशय संथ गतीने फिरत असतात. कधी-कधी प्लेट्स (खडक) एकमेकांवर आदळतात किंवा त्यांची टक्कर होते. या घर्षणामुळे तयार होणारी ऊर्जा जमिनीच्या वर आल्यामुळे भूकंपाचे धक्के बसतात.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT