Maharashtra Monsoon Update Saam Tv
देश विदेश

Monsoon Update : आनंदवार्ता! ४ दिवस आधीच मान्सून येणार, कोकणात कधी दाखल होणार? अधिकृत तारखा आल्या समोर

Maharashtra Monsoon Update news : भारतामध्ये यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता असून १६ मेपासून अंदमान-निकोबार भागात सक्रिय होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणात ६ जूनपासून पावसाला सुरुवात होईल.

Alisha Khedekar

  • यंदा मान्सून नेहमीपेक्षा लवकर येण्याची शक्यता

  • १६ मेपासून अंदमान भागात सक्रिय होणार

  • कोकणात ६ जूनपासून पावसाचा अंदाज

  • एल निनोमुळे हवामानात बदल दिसून येणार

देशातील हवामान यंदा सातत्याने बदलताना पाहायला मिळतं आहे. मात्र आता नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. १६ मे पर्यंत भारतात मान्सून दाखल होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये कडक उन्हाचा तडाखा बसत असताना आता काहीसा दिलासा मिळणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा मान्सून नेहमीपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. साधारणपणे जूनच्या सुरुवातीला देशाचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये मान्सून यंदा २५ मे च्या सुमारासच केरळमध्ये पोहोचू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्याआधीच १६ मे रोजी तो दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांवर सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, ‘एल निनो’च्या प्रभावामुळे मान्सूनच्या हालचालींमध्ये बदल होत असून, यंदा तो लवकर येण्याचे संकेत आहेत. तसेच, IMD च्या अंदाजानुसार, अनुकूल हवामानामुळे मान्सून ६ जून रोजी कोकणात दाखल होणार आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या कोकणकरांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

उत्तर भारतातही काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसासोबतच हिमवृष्टीचीही शक्यता आहे. तर ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. एकूणच, बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक असून, पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Loan Rules: गोल्ड लोन फेडल्यानंतरही सोने मिळाले नाही? बँकेने उशीर केल्यास द्यावे लागणार दररोज ५ हजार रुपये, वाचा नवे नियम

Maharashtra News Live Update: सावरकर मुद्द्यांबाबत महायुतीची दुटप्पी भूमिका?

kitchen Tips : भाजीची पातळ झालीय? चव न बदलता घट्ट करण्यासाठी करा हे ५ सोपे घरगुती उपाय

मुंबईची वाहतूक कोंडी कमी होणार; असा आहे राज्य सरकारचा 'पाताल लोक' प्लान

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; शिवसेना नेत्याला वेगळाच संशय, थेट चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT