Ethanol-Blended petrol Fuel Without Choice? Supreme Court to Examine E20 Policy : कोणतीही पूर्व कल्पना, माहिती न देता अथवा लेबलिंग किंवा इंधनाच्या रचनेची माहिती न देता इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच भारतात उपलब्ध करून दिलं जात आहे. यामुळे भारतातील अनेकजण गोंधळलेले आहेत, हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात पोहचले आहे. पेट्रोलसंदर्भात एक जनहित याचिका (PIL) सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली आहे. 20% इथेनॉल-मिश्रित पेट्रोल (E20) लागू करण्याविरोधात ही याचिका दाखल करँण्यात आली आहे. जोपर्यंत ग्राहकांना इथेनॉल-मुक्त इंधन निवडण्याचा पर्याय दिला जात नाही, तोपर्यंत याची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. अक्षय मल्होत्रा यांनी ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यांनी याचिकेद्वारे देशातील इंधनाच्या गुणवत्तेचा आणि ग्राहकांच्या हक्कांच्या प्रश्न उपस्थित केला आहे.
एप्रिल २०२३ च्या आधी भारतात तयार झालेली वाहने ही इथेनॉल-मिश्रित पेट्रोलला अनुकूल नाहीत. धक्कादायक म्हणजे, गेल्या दोन वर्षांत बनलेली BS-VI मानकांची वाहनेही 20% इथेनॉल मिश्रण असलेल्या पेट्रोलसाठी योग्य नाहीत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. वाहन निर्माते आणि संशोधन संस्थांच्या अहवालानुसार इथेनॉलच्या मिश्रणामुळे इंजिनमध्ये गंज लागू शकतो. इंधनाची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि वाहने वेळेपूर्वी खराब होऊ शकतात, असेही याचिकेत म्हटले आहे.
इथेनॉल-मिश्रित इंधनामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीला विमा कंपन्या कव्हर करणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांना कोणताही मोबदला मिळणार नाही. वाहने इथेनॉल-मिश्रित पेट्रोलसाठी अनुकूल नसल्याने त्यांचे नुकसान होईल. त्यामुळे यासंदर्भातील कोणताही दावा वाहन निर्माते किंवा विमा कंपन्या कव्हर करणार नाहीत. कारण ग्राहकांनी त्या अटींचे उल्लंघन केले. म्हणजेच याचा थेट अर्थ असा की तुमची गाडी E20 पेट्रोलमुळे खराब झाली, तर दुरुस्तीचा खर्च तुम्हालाच करावा लागेल, असा दावा याचिकेत केला आहे.
भारतातील ग्राहकांना कोणतीही माहिती न देता अथना न दाखवता फक्त इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच उपलब्ध करून दिलं जात आहे. त्यामुळे ग्राहक गोंधळलेले आहेत आणि त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही, असा आरोप याचिकेत करताना काही महत्त्वाच्या मुद्द्यावर कोर्टाचे लक्ष केंद्रीत केलेय. याचिकेत खालील चार महत्त्वाचे मुद्दे मांडले गेलेत...
सर्व पेट्रोल पंपांवर इथेनॉल-मुक्त पेट्रोल उपलब्ध करावे
इथेनॉलच्या प्रमाणाचे लेबलिंग अनिवार्य करावे.
ग्राहक संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी.
E20 च्या वापरामुळे वाहनांवर होणाऱ्या परिणामांचा देशव्यापी अभ्यास करावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.