Ciel Dubai Marina — the world’s tallest hotel standing at 377 metres, offering breathtaking views of Palm Jumeirah and Dubai Marina. Saam Tv
देश विदेश

World Tallest Hotel: जगातील सर्वात उंच हॉटेल, कुतुबमिनारपेक्षा 5 पट उंच

Dubai Unveils the World’s Tallest Hotel: तुम्ही आतापर्यंत बुर्ज खलिफाबद्दल ऐकलं असेल, दुबईतल्या या गगनचुंबी इमारतीनं साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलंय. मात्र आता याच दुबईत जगातील सर्वात उंच हॉटेलही तयार झालंय.

Omkar Sonawane

दुबईत जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. श्रीमंतांचं शहर अशी ओळख असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफा ही इमारत सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. मात्र या इमारतीला तोडीस तोड जगातील सर्वाच उंच हॉटेलही आता दुबईमध्येच उभं राहिलंय. या हॉटेलचं नाव आहे सिएल दुबई मरीना...15 नोव्हेंबरपासून हे हॉटेल सर्वांसाठी खुलं होणारंय. अधुनिक तंत्रज्ञान आणि स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून या हॉटेलकडे पाहिलं जातं

दुबईतलं हे हॉटेल कुतुबमिनारपेक्षा 5 पट उंच आहे. या हॉटेलची उंची 377 मीटर इतकी आहे. ‘द फर्स्ट ग्रुप’ या प्रसिद्ध हॉटेल चेननं ते बांधलंय. बांधले आहे. 82 मजली इमारतीत मोठ्या प्रमाणात काचेचा वापर करण्यात आला असून, ती दुबईच्या स्कायलाइनला आणखी आकर्षक बनवते. हॉटेलच्या प्रत्येक खोलीतून पाम जुमैरा आणि मरीना स्कायलाइनचा अप्रतिम नजारा पाहायला मिळतो. तर 76व्या मजल्यावर जगातील सर्वात उंच इन्फिनिटी पूल बांधण्यात आलाय. 81 व्या मजल्यावर टॅटू स्काय लाऊंज पाहायला मिळेल.

रुफटॉप ऑब्झर्व्हेशन डेक, येथून बुर्ज अल अरब, संपूर्ण दुबई शहराचा 360 डिग्री व्ह्यू पाहता येईल.हॉटेलच्या उद्घाटनावेळी एका रात्रीसाठी खोलींची सुरुवातीची किंमत 30 हजार इतकी ठेवण्यात आलीय. तर प्रीमियम सुट्स ज्यात मोठ्या जागा आणि विशेष लाउंज एक्सेस असून, त्याची किंमत 56 हजार रूपये असेल. अलीकडच्या काळात दुबईत टूरिझम सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आलीय. 2024 मध्येच शहराने 1.7 कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटकांचं स्वागत केलं. आता सिएल दुबई मरीनाच्या उद्घाटनानंतर ही संख्या आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics : बिहारमध्ये काँग्रेसचं पानिपत; कोणत्या चुका ठरल्या पराभवाचं कारण?

Bihar : आई आणि कुटुंबातील सदस्यांचीही मते मिळाली नाहीत; पराभूत उमेदवाराने फोडलं EVMवर खापर

Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिघाडी; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार

Maharashtra Civic Polls: राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर?निवडणुकांचा मुहूर्त मार्च 2026 नंतर ?

Maharashtra Live News Update: DRI मुंबईची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 1.718 किलो कोकेन जप्त

SCROLL FOR NEXT