Emergency Landing  Saam Tv
देश विदेश

Emergency Landing: अहमदाबादहून दुबईला निघालेल्या विमानात तरुणाला हार्ट अ‍ॅटॅक; पाकिस्तानात इमर्जन्सी लँडिंग

Emergency Landing Of Flight: अहमदाबादहून दुबईला जाणाऱ्या विमानात एका २७ वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने विमानाचं इमर्जन्सी लँडिग करण्यात आलं. पाकिस्तानातील कराची विमानतळावर हे विमान लँड करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Landing Of Flight Due To Medical Emergency :

अहमदाबादहून दुबईला जाणाऱ्या विमानात एका २७ वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने विमानाचं इमर्जन्सी लँडिग करण्यात आलं. पाकिस्तानातील कराची विमानतळावर हे विमान लँड करण्यात आले.

अहमदाबादहून स्पाइसजेटचे विमान दुबईला जात होते. या विमानात अचानक एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेतल वैमानिकाने विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याच्या निर्णय घेतला. त्यामुळे अहमदाबादहून निघालेलं स्पाईसजेटच्या बोईंग-737 फ्लाइटचे कराचीमध्ये इमर्जन्सी लँडिग करण्यात आले.

एअरलाइन्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, धारवाल धरमेश या तरुणाला प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे अहमदाबादवरुन दुबईला जाणारे विमान कराचीच्या जिन्ना विमानतळावर लँडिग करण्यात आले आहे.

त्यानंतर तरुणाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तरुणाची शुगर लेव्हल कमी झाली होती आणि हृदयाचे ठोके वाढले होते. उपचार केल्यानंतर तरुणाच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली. त्यानंतर विमान पुन्हा दुबईच्या दिशेने रवाना झाले.

यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी हैदराबादहून जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाला मेडिकल इमर्जन्सी आली होती. यानंतर विमानाचे कराची येथे इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानातील प्रवाशाला मृत घोषित करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari Case : नितीन गडकरींना धमकी, १०० कोटी खंडणीची मागणी; दोघांना ५ वर्षे तुरुंगवास

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

SCROLL FOR NEXT