Dubai Plane Crash Saam Tv
देश विदेश

Plane Crash: तेजस लढाऊ विमान कोसळून पायलटचा मृत्यू; उड्डाणापासून क्रॅशपर्यंतच्या घटनेचा थरारक VIDEO

Dubai Plane Crash Vide: दुबई एअर शोदरम्यान विमान कोसळल्याची घटना घडली. भारतीय लढाऊ विमान तेजस कोसळले. उड्डाणापासून क्रॅशपर्यंतच्या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

Summary:

  • दुबई एअर शोदरम्यान विमान कोसळून मोठी दुर्घटना

  • उड्डाण घेताच लढाऊ विमान तेजस कोसळलं

  • विमान कोसळतानाचे व्हिडिओ समोर आलेत

दुबईमध्ये एअर शोदरम्यान शुक्रवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. एअर शो सुरू असताना उड्डाण घेतलेले लढाऊ विमान तेजस कोसळले. भारतीय हवाई दलाने या अपघातासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी असे लिहिले की, दुबईत एअर शोदरम्यान हवाई दलाचे तेजस विमान कोसळले. या विमान अपघातामध्ये पालयटचा मृत्यू झाला. अपघातानंतर कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी दुपारी २.१० वाजता ही दुर्घटना घडली. दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमानाने उड्डाण घेतले त्यानंतर काही क्षणात ते कोसळलं. विमान जमिनीवर आदळल्यानंतर आगीचा गोळा बनले. भीषण आग आणि धुराचे लोट सगळीकडे पसरले. या दुर्घटनेनंतर विमानाची प्रात्यक्षिक थांबवण्यात आली.

अपघातानंतर तात्काळ आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. एअर शो पाहण्यासाठी आलेली लहान मुलं आणि महिला या घटनेमुळे प्रचंड घाबरले. एअर शो पाहण्यासाठी आलेले काही जण आपल्या मोबाईलमध्ये प्रात्यक्षिकांचे व्हिडीओ शूट करत होते त्याचवेळी हा अपघात झाला. ही घटना त्यांच्या मोबाईलमध्ये कैद झाली. उड्डाणापासून क्रॅशपर्यंतच्या घटनेचा हा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, गुरूवारी दुबई एअर शो संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तेजस एमके१ मध्ये तेल गळती झाल्याचा दावा करण्यात आला होता. पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा खोटा असल्याचे सांगितले. पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे की, "दुबई एअर शो २०२५ दरम्यान भारतीय एलसीए तेजस एमके१ मध्ये तेल गळती झाल्याचा दावा करणारे व्हिडिओ शेअर केले जात आहेत ते खोटे आहेत. अशा खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaibhav Naik: सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय तोडफोड प्रकरणी ठाकरे गटाला दिलासा; माजी आमदार वैभव नाईकांची निर्दोष मुक्तता

Gavran Pithla Bhakri: गावरान पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल पिठलं, ज्वारीच्या भाकरीसोबत आखा जेवणाचा बेत

Maharashtra Live News Update : : सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय तोडफोड प्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांची निर्दोष मुक्तता

Govt Hospital Scandal: चादर अंगावर ओढली; हॉस्पिटलच्या वेटिंग एरियातच जोडप्याने ठेवले शरीरसंबंध; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतापले

Aloo Lachcha Recipe: संध्याकाळचा नाश्त्याला बनवा क्रिस्पी अन् टेस्टी आलू लच्छा, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT