Viral Saam
देश विदेश

Shocking News: आधी शाळेत घुसला, कपडे काढले, वर्गातून मुलांना बाहेर काढलं, मग महिला शिक्षकाबरोबर...VIDEO व्हायरल..

Shocking Incident in Meerut School Goes Viral: व्हायरल व्हिडिओमध्ये एक पुरुष सरकारी शाळेत जबरदस्ती घुसतो. कपडे काढतो. नंतर वर्गात महिला शिक्षकाबरोबर गैरवर्तन केलं.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशातील मेरठचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक पुरुष सरकारी शाळेत जबरदस्ती घुसतो. कपडे काढतो. वर्गातील मुलांना बाहेर काढतो. तसेच महिला शिक्षकासमोर अपशब्द वापरून त्यांच्यासोबत गैरवर्तन करतो. आरोपीच्या कंबरेवर एक दारूची बाटली देखील लटकलेली दिसत आहे. या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी त्या व्यक्तीवर कारवाई केली आहे.

मेरठमधील जितौला गावातील प्राथमिक शाळेत एक व्यक्ती दारू पिऊन आला. शिवकुमार असे त्या व्यक्तीचे नाव आहे. शाळेत घुसताच त्यानं गोंधळ घालायला सुरुवात केली. तसेच वर्गातून मुलांना बाहेर काढले. नंतर शिवकुमारने आपला टी शर्ट काढला. तसेच महिला शिक्षकासमोर शिवीगाळ करत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.

महिला शिक्षकाने त्याला वर्गातून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला.पण त्याने ऐकले नाही. शिक्षकेचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यानंतर शाळेतील शिक्षकांनी आरोपीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली.पुरावा म्हणून रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सादर केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक तरुणाने प्राथमिक शाळेत मद्यधुंद अवस्थेत शिक्षकांशी गैरवर्तन केले.दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपीला अटक करण्यात आले आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT