Pune News: पुण्यात राडा! भावावर रंग टाकला? जाब विचारायला आलेल्या तरूणावर कोयत्यानं सपासप वार

Holi violence in Pune: धुळवडीच्या दिवशी २ आरोपींनी कोयत्याने वार करत एकाला गंभीर जखमी केलं आहे. ही घटना पुण्यातील येरवडा परिसरात घडली आहे.
Pune
PuneSaam
Published On

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या सत्रात वाढ झाली आहे. धुळवडीच्या दिवशी एका व्यक्तीनं कोयत्याने वार करत गंभीर जखमी केलं आहे. भावावर रंग टाकल्याचा जाब विचारल्यानं तरूणाने कोयत्यानं सपासप वार केले. तसेच दगडानं देखील ठेचलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित ननावरे हा धुळवडच्या दिवशी राजीव गांधी नगर परिसरातून जात होता. यादरम्यान, २ तरुणांनी त्याची वाट अडवली. जबरदस्तीने रंग लावून त्याच्या डोक्यावर अंड फोडलं. यानंतर रोहितनं घडलेली घटना आपल्या भावाला सांगितली.

Pune
Sambhajinagar: कुटुंबासोबत जेवण केलं, घरी जाऊन आयुष्य संपवलं; २५ वर्षीय तरूणीनं घेतला टोकाचा निर्णय

रोहित याचा भाऊ ऋतिक त्या परिसरात गेला आणि भावावर रंग का टाकला याचा जाब २ तरूणांना विचारला. जाब विचारल्यानंतर आरोपींनी कोयता बाहेर काढला. ऋतिकवर बबल्या आणि त्याच्या मित्राने मारहाण करत कोयत्याने सपासप वार केले. इतकंच नाही तर, पोटात दगड घालून गंभीर जखमी केलं.

Pune
Beed Case: संतोष देशमुखांच्या हत्येचा तीव्र निषेध साता समुद्रापार, होळीत वाल्मिक कराडसह आरोपींचा फोटो जाळला

या हल्ल्यात ऋतिक गंभीर जखमी झाला. त्यानंतर ऋतिकनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार दाखल करताना "रंग पंचमीला भांडण करतो का?" असा उलटा जबाब विचारला आणि तक्रार घ्यायला पोलिसांनी उशीर केला, अशी माहिती ऋतिकने दिली. यानंतर आरोपी बबलू आणि त्याच्या मित्रावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com