Madhya Pradesh Crime News Saam Tv
देश विदेश

Crime News : बायकोचा चहा करायला नकार, नवऱ्याची सटकली, पोरांसमोरच धाडधाड गोळ्या झाडल्या

Madhya Pradesh Crime News : ग्वाल्हेरमध्ये स्वयंपाक न केल्याच्या कारणावरून दारूच्या नशेत असलेल्या नवऱ्याने पत्नीवर गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • स्वयंपाकाच्या कारणावरून नवऱ्याने पत्नीची गोळ्या घालून हत्या केली

  • आरोपी दारूच्या नशेत असल्याची माहिती

  • घटनेवेळी घरात दोन अल्पवयीन मुलं उपस्थित

  • पोलिसांनी आरोपीला काही तासांत अटक केली

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बायकोने स्वयंपाक करण्यास नकार दिल्याने नशेत असलेल्या नवऱ्याने तिच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मुरार परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव सोनू तोमर असे आहे. सोनूला दारूचे व्यसन होते. तो दररोज दारू पिऊन बायकोला त्रास द्यायचा. घटनेच्या दिवशी आरोपी सोनूची बायको आजरी होती. तरीही सोनुने तिच्यामागे स्वयंपाक करण्याचा आणि चहा बनवून देण्याचा तगादा लावला होता. मात्र आरोपीच्या पत्नीने जेवण बनवायला नकार दिला.

बायकोचे उत्तर ऐकून संतापलेल्या सोनुने बंदूक काढून थेट बायकोच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. या दुर्घटनेत आरोपीच्या बायकोचा जागीच मृत्यू झाला. या घटनेवेळी घरी सोनूची दोन अल्पवयीन मुलं आणि पालक होते. आरोपीच्या वडिलांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आला.

दरम्यान बायकोची हत्या करून सोनुने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी काही तासांमध्ये आरोपीला दारू पिताना एका अड्ड्यावरून उचलले आणि बेड्या ठोकल्या, शिवाय गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान, आरोपीने खुनातील हत्यार फेकून दिल्याचा दावा केला. पोलीस त्याचा शोध घेत असून त्याचे पूर्वीचे कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत का याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गातील 110 नागरीक आखाती देशात अडकले- जिल्हाधिकाऱ्यांची माहीतीलागतील- राजू शेट्टी

Iran-Israel War: इस्राइलच्या हल्ल्यात इराणच्या नव्या संरक्षणमंत्र्याचा मृत्यू, ४८ तासांपूर्वी स्वीकारला होता पदभार

प्रेमाचा रक्तरंजित शेवट; होळीच्या दिवशी नवऱ्याने बॉयफ्रेंडसोबत राहणाऱ्या बायकोला क्रूरपणे संपवलं

जयदेव ठाकरेंच्या अंगरक्षकाची सरकारी पिस्तुलाची चोरी; बॅगेत 29 जिवंत काडतुसे, मुंबईत खळबळ

Types of Paithani Saree: लग्नसराईसाठी पैठणी साडीचे ७ ट्रेंडी पॅटर्न नक्की करा ट्राय; तुम्हीच दिसाल सगळ्यात उठून

SCROLL FOR NEXT