viral video  Saam tv
देश विदेश

पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि महिला कॉन्स्टेबल नशेत बेधुंद; बेडरूममधील अश्लील व्हिडिओ व्हायरल, कर्मचारी वर्तुळात खळबळ

Obscene viral video : पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि महिला कॉन्स्टेबल नशेत बेधुंद असलेल्या दोघांचा बेडरूममधील अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे.

Vishal Gangurde

दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल

दोघेही रेहड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत

वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडून तत्काळ दोघांवर निलंबनाची कारवाई

उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी विभागाची अब्रु चव्हाट्यावर आणली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि महिला शिपाईचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघेही व्हिडिओत नशेत बेधुंद असल्याचे दिसत आहे. दोन्ही पोलीस कर्मचारी जिल्ह्यातील रेहड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ हा पोलीस क्वार्टरमधील असल्याचा सांगण्यात येत आहे. दारुच्या नशेत दोघांनी व्हिडिओ तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, 'दोघेही एकमेकांसोबत मित्रांसारखे एकत्र असायचे. दोघे दररोज एकत्र दारू प्यायचे. दोघांचा पोलिसांच्या वर्दीवरील अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीस विभागावर जोरदार टीका होऊ लागली आहे'.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच बिजनौरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अभिषेक झा यांनी दोघांना निलंबित केलं आहे. त्याचबरोबर दोघांच्या विरोधात विभागीय पातळीवर चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोघांनी स्वत:चा व्हिडिओ व्हायरल का केला, याची चर्चा पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.

दोन्ही कर्मचारी विवाहित

दोन्ही पोलीस कर्मचारी विवाहित आहेत. दोघांचं कुटुंब पोलीस स्टेशनच्या जवळ असलेल्या सरकारी पोलीस क्वार्टरमध्ये राहत आहे. दोघांनी मर्यादांचं उल्लंघन करून धक्कादायक कृत्य केले. पोलीस अधीक्षक अभिषेक झा म्हणाले की, दोन्ही पोलिसांचं कृत्य लोकसेवक कायद्याचे उल्लंघन करत नाही तर विभागाची प्रतिभा डागाळणारं आहे'.

पोलीस विभागाची शिस्त आणि प्रतिष्ठेला कलंक लावणाऱ्या प्रकरणाची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांना तत्काळ निलंबित केलं आहे. या प्रकरणाचा अहवाल समोर आल्यानंतर दोघांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दर्यापुरात अवघ्या 7 सेकंदात जिंकली बैलगाडा शर्यत

Black Saree Contrast Blouse: काळ्या रंगाच्या साडीवर उठून दिसतील हे ७ ट्रेंडी आणि सुंदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज

Sambhajinagar News : 'आता उद्यापासून बांगड्या घालायला लावू' छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, काय आहे प्रकरण?

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची नावे द्या आणि बक्षिसं जिंका, पोलिसांची अनोखी योजना

शेतात कांद्याचं पीक, पांढरी अन् गुलाबी फुलं येताच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचं बिंग फुटलं; पोलिसांनी धाड टाकली, दृश्य बघून चक्रावले!

SCROLL FOR NEXT