इराक पंतप्रधानांच्या घरावर ड्रोन हल्ला Saam Tv
देश विदेश

इराक पंतप्रधानांच्या घरावर ड्रोन हल्ला

इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांच्या घरी स्फोटक असलेल्या ड्रोनने हल्ला करण्यात आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांच्या घरी स्फोटक असलेल्या ड्रोनने हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला रविवारी सकाळी झाला आहे. यातून इराकचे पंतप्रधान थोडक्यात वाचले आहेत. इराकी लष्कराने हा हल्ला पंतप्रधानांची हत्या करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात काही लोक जखमी झाले आहेत.

हे देखील पहा-

इराकी लष्कराने या हल्ल्याविषयी सांगितले आहे की, कदीमी यांच्या बगदाद मधील घरी हल्ला करण्यात आला आहे. ग्रीन झोनला टार्गेट करण्यात आले होते. अद्याप याबाबत अधिक माहिती लष्कराने दिलेली नाही. इराकच्या सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कदीमी यांच्या निवासस्थानी ड्रोनने हल्ला करण्यात आला आहे.

सुदैवाने यात पंतप्रधान कदीमी यांना कोणतीही इजा झाली नाही. हल्ल्यानंतर कदीमी यांनी ट्विट करून, आपण सुखरुप असल्याचे सांगितले आहे. तसेच लोकांनी शांतता राखावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. पंतप्रधान निवासस्थानाच्या परिसरात ग्रीन झोनमध्ये सरकारी इमारती आणि परदेशी दूतावास आहेत. पाश्चिमात्य देशांच्या राजदूतांनी सांगितले आहे की, त्यांनी स्फोटाचे आणि गोळीबाराचे आवाज ऐकले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर महापालिकेत भाजपच्या विजयानंतर शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी

Success Story: IIT मधून इंजिनिरिंग, नंतर MBA; युट्यूबवरुन अभ्यास केला, ४ वर्षात तीनदा UPSC क्रॅक; IAS रोमा श्रीवास्तव यांचा प्रवास

Budh Gochar: 12 महिन्यांनंतर बुध बनवणार पॉवरफुल डबल राजयोग; या राशींच्या दारी पडणार पैशांचा पाऊस

Chanakya Niti: तोंडावर गोड बोलणारे विषारी लोक ओळखण्यासाठी ३ सोपे मार्ग, वेळीच व्हा सावध

Horoscope: अनपेक्षित घटना घडतील, वैवाहिक जीवनात येईल आनंद; ३ राशींसाठी आज दिवस ठरेल महत्त्वाचा

SCROLL FOR NEXT