पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) भाजपला बहुमत मिळाले होते. काँग्रेस गोव्यात सत्ता स्थापन करेल अशी हवा निवडणुकीआधी होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांची जादू गोवा निवडणुकीत चालली. भाजप निवडणून येऊन अनेक दिवस लोटले परंतु सत्ता काय स्थापन होत नव्हती. तिकडे पंजाबमध्ये (Punjab) आपने आपली सत्ता स्थापन करुन काही मोठे निर्णयही घेतले. त्यामुळे एकंदरीतच सत्ता स्थापनेवरुन भाजपाला (BJP) टीका सहन करावी लागत होती.
गोव्याच्या मुख्यमंत्री पदी कोण बसणार? कोणाचं नाव समोर येणार अशा अनेक चर्चा होत्या. विश्वजीत राणे, प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची नावं चर्चेत होती. परंतु आता प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. काही दिवसांपुर्वी विश्वजीत राणे, प्रमोद सावंत यांनी जे.पी.नड्डा, गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेत घेवून चर्चा केली होती. मात्र, आता शेवटी प्रमोद सावंत यांचीच गोव्याच्या मुख्यमंत्री पदी वर्णी लागली आहे.
विधीमंडळ पक्षनेतेपदी प्रमोद सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव विश्वजित राणे यांनीच मांडला. सर्वांनी एकमताने सावंत यांची नेतेपदी निवड केली. ते पुढील 5 वर्षे विधिमंडळ पक्षाचे नेते असतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यात गोवा आणि उत्तराखंड राज्यांमधील नेतृत्वाबाबत चर्चा झाली होती. महाराष्ट्रात अधिवेशन सुरु असतानाही देवेंद्र फडणवीस तात्काळ दिल्लीला दाखल झाले होती आणि तेही या चर्चेत सहभागी झाले होते.
आता पुढील निर्णय प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असलेले विश्वजीत राणे यांना पक्ष आणि सावंत कोणती जबाबदारी सोपवतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत नेता निवडीबरोबर मंत्रिपदाविषयी चर्चा झाली असून, मगोप आणि गोवा फॉरवर्ड यांना मंत्रिमंडळात घेण्याविषयी पक्षाचे वरिष्ठ अनुकूल असल्याचंही समोर आले आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.