Senior BJP leader Jayaprakash Chaturvedi and Congress veteran Hira Singh Bisht passed away, leaving political circles in deep mourning. saam tv
देश विदेश

एकाच दिवशी दोन दिग्गज नेत्यांचे निधन; भाजप- काँग्रेसवर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

Two Senior Indian Political Leaders Died In One Day News Details: उत्तरप्रदेशातील भाजपचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश चतुर्वेदी आणि उत्तराखंडमधील काँग्रेसचे दिग्गज नेते हिरा सिंग बिष्ट यांचे एका दिवसात निधन झाले. या दुहेरी धक्क्याने दोन्ही पक्षांमध्ये शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Omkar Sonawane

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडच्या राजकारणातून एक दु: खद घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे माजी संघटन मंत्री आणि ज्येष्ठ नेते जयप्रकाश चतुर्वेदी यांचे निधन झाले, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री हिरा सिंग बिष्ट यांचेही काल रात्री निधन झाले. या दोन प्रमुख नेत्यांच्या निधनाने दोन्ही राज्याच्या आणि पक्षावर दु;खाचा डोंगर कोसळला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश चतुर्वेदी यांच्या निधनाची बातमी समजताच लखनऊ येथील पक्षाच्या कार्यालयात नेत्यांची गर्दी झाली. अंतिम दर्शन आणि आदरांजलीसाठी त्यांचे पार्थिव भाजपच्या मुख्यालयात आणण्यात आले. याठिकाणी राज्य संघटन सरचिटणीस धरमपाल आणि उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या अश्रू तरळले असून पुष्पहार अर्पण केले. विधानसभा अध्यक्ष सतीश महाना आणि राज्य उपाध्यक्ष नीरज सिंह हेही उपस्थित होते. त्यांच्या सन्मानार्थ पक्ष कार्यालयात दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले आणि त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचे निधन

दरम्यान उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिरा सिंह बिष्ट यांचे पहाटे दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. काँग्रेस सरकारमध्ये 3 वेळा आमदार आणि मंत्री राहिलेले हिरा सिंह बिष्ट हे उत्तराखंडच्या राजकारणातील मोठे व्यक्तिमत्व होते. ते नेहमीच सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्यासाठी ओळखले जात होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच काँग्रेसवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात बनवा अळुच्या पानांची कुरकुरीत भाजी

Shocking : रात्री एकत्र जेवले, सकाळी मृतदेहच भेटला; प्रियकराच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या पत्नीनं घेतला जीव

Paach Futaacha Bachchan: वारकरी परंपरेची अनोखी कथा मोठ्या पडद्यावर; 'पाच फुटाचा बच्चन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Maharashtra News Live Update: निंबवली फाट्याजवळ उभ्या टेम्पोला भीषण आग

पावसाळ्यात मिळणारी कुड्याच्या फुलांची रानभाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT