lawyer judge verbal spat jharkhand high court viral video AI image
देश विदेश

Lawyer-Judge verbal spat: डोन्ट क्रॉस द लिमिट! वकिलानं न्यायाधीशांना रोखठोक सुनावलं, हायकोर्टातच ड्रामा

lawyer judge verbal spat jharkhand high court viral video : झारखंड हायकोर्टात सुनावणीवेळी वकील आणि न्यायाधीशांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तुम्ही मर्यादेत राहा, असं वकिलानं थेट न्यायाधीशांना सुनावलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nandkumar Joshi

  • झारखंड हायकोर्टात वकील आणि न्यायाधीशांमध्ये शाब्दिक वाद

  • मर्यादा ओलांडू नका, वकिलानं न्यायाधीशांना सुनावलं

  • संबंधित वकिलाला कोर्टाकडून नोटीस

झारखंड हायकोर्टात गुरुवारी वकील आणि न्यायाधीश यांच्यात झालेल्या शाब्दिक वादाने दुसऱ्या दिवशी गंभीर रूप धारण केलं. एक वकील आणि न्यायाधीशांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. वकिलांचा अपमान करू नका, तुम्ही तुमची मर्यादा ओलांडू नका, असं वकिलानं न्यायाधीशांना सगळ्यांसमोरच सुनावलं. यानंतर कोर्टानं संबंधित वकिलाला कंटेम्प्ट नोटीस बजावली आहे.

झारखंड हायकोर्टात एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी जोरदार ड्रामा बघायला मिळाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. वकील आणि न्यायाधीशांमध्ये शाब्दिक चकमक झाली. वकील महेश तिवारी यांनी सुनावणीवेळी न्यायाधीशांना सुनावले. मी माझ्या पद्धतीने युक्तिवाद करेल. कुणाचाही अपमान करू नका. वकिलांचा अपमान करू नका. मर्यादा ओलांडू नका, असं तिवारी न्यायाधीशांना बोलताना या व्हिडिओत दिसत आहे.

या प्रकारानंतर संबंधित वकील तिवारींना कोर्टानं अवमान नोटीस बजावली आहे. या प्रकरणावर हायकोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेतली जाईल. मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने तिवारींना तीन आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. बार काउंसिलचे अध्यक्ष म्हणाले की, हे काय गंभीर प्रकरण दिसत नाही. मात्र, सोशल मीडियावर लोक हे प्रकरण न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेशी जोडत आहेत.

देश जळतोय...व्हायरल व्हिडिओत काय म्हणाले वकील तिवारी?

वकील आणि न्यायाधीशांमधील शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वकील तिवारी यांनी न्यायाधीशांशी वाद घातला. देश जळतोय, असं तिवारी न्यायाधीशांना बोलताना दिसत आहेत. तर न्या. राजेश कुमार यांनी वकिलाच्या युक्तीवादाच्या शैलीवर आक्षेप घेतल्याचे क्लिपमध्ये पाहायला मिळत आहे. पण यावर वकील तिवारी म्हणाले की, मी माझ्या पद्धतीने युक्तिवाद करणार आहे. तुम्ही कुणालाही कमी लेखू नका. या शाब्दिक वादानंतर कोर्टरूममध्ये काही वेळ तणावाचं वातावरण होतं.

कोर्टाची कठोर भूमिका

वकील तिवारी यांना कोर्टानं अवमान नोटीस बजावली असून, शुक्रवारी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासोर सुनावणी झाली. कोर्टाच्या प्रतिष्ठेशी संबंधित प्रत्येक प्रकरण गंभीर आहे. मुख्य न्यायमूर्ती म्हणाले की, न्यायव्यवस्थेवरील टीका अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, पण कोर्टाच्या आत शिस्त महत्वाची आहे. तिवारी यांना तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणावर पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे.

फक्त बाचाबाची, वाद नाही! बार काउंसिलचं स्पष्टीकरण

झारखंडच्या बार काउंसिलचे अध्यक्ष राजेंद्र कृष्णा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय. इतकी काही गंभीर बाब नाही. असे प्रकार कोर्टात होतच राहतात. कोणीही जाणूनबुजून अपमान करत नाही, असे ते म्हणाले. दरम्यान कोर्टाच्या लाइव्ह स्ट्रिमिंगवरून क्लिप घेऊन ती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे. हा व्हिडिओ काही मिनिटांनंतर हटवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT