अमित शहा यांनी सभागृहात चर्चेदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. अमित शहांच्या विरोधात काही ठिकाणी आंदोलने करण्यात आली. राज्यसभेतही बुधवारी यावरून जोरदार गदारोळ झाला. त्याचवेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति असलेल्या सरकारच्या कटिबद्धतेवर जोर देत विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
डॉ. आंबेडकर यांच्याबद्दलच्या वक्तव्याला तोडूनमोडून सांगितलं जात असल्याचा आरोप त्यांनी विरोधकांवर केला. आमचं सरकार डॉ. आंबेडकरांचे विचार आणि योगदानाशी कटिबद्ध आहे. याउलट काँग्रेसनं प्रत्येक वेळी आंबेडकरांचा अपमान केला आहे, असा हल्लाबोलही रिजिजू यांनी केला.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सभागृहात चर्चेवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यावर किरेन रिजिजू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. काँग्रेसने कशा पद्धतीने वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे हे केवळ गृहमंत्री शहा यांनी सांगितले. १२ सेकंदाचा व्हिडिओ काढून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा पलटवार रिजिजू यांनी विरोधी पक्षांवर केला.
देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असून, मी याचा कठोर शब्दांत निषेध व्यक्त करतो. गृहमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुंबई आणि विदर्भात षडयंत्र रचून पराभूत करण्याचं काम केलं होतं. यासाठी काँग्रेसने देशाची माफी मागायला हवी, असं रिजिजू म्हणाले.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर आरोप केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुन्हा एकदा संसदेत निवडून जायचे होते. मात्र, काँग्रेसने षडयंत्र रचून त्यांचा पराभव केला. त्यानंतर आंबेडकरांनी पुन्हा निवडणूकच लढवली नाही. १९५६ मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतरही काँग्रेसने त्यांना अनेक वर्षे 'भारतरत्न' पुरस्कारासाठी उचित ठरवले नाही, असं रिजिजू म्हणाले.
डॉ. आंबेडकर यांना सन १९९० मध्ये भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. मात्र, हा सन्मान त्यांना यापूर्वीच मिळायला हवा होता, असंही रिजिजू म्हणाले. सरकारकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांना विरोधी पक्ष चुकीच्या पद्धतीने सादर करत आहेत. देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. डॉ. आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचं काम सरकार सातत्याने करत आहे, असंही रिजिजू म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.