Donald Trump x
देश विदेश

Donald Trump : ट्रम्प C*#@#a...! अमेरिकन तज्ज्ञाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दिल्या हिंदीत शिव्या, VIDEO

US Political Expert insulted Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळावर निराशा व्यक्त करताना अमेरिकन राजकीय तज्ज्ञ कॅरोल क्रिस्टीन फेअर यांनी हिंदीत शिव्या दिल्या.

Yash Shirke

  • अमेरिकन राजकीय तज्ज्ञ कॅरोल क्रिस्टीन फेअर यांनी मुलाखतीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना हिंदीत शिव्या दिल्या.

  • ट्रम्प यांच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळावर नाराजी व्यक्त करताना त्यांनी "Ch****a" हा शब्द वापरला.

  • फेअर या जॉर्जटाऊन विद्यापीठातील प्राध्यापिका असून, स्पष्टवक्तेपणासाठी त्या ओळखल्या जातात.

एका अमेरिकन राजकीय तज्ज्ञ महिलेने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाड्र ट्रम्प यांच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळावर निराशा व्यक्त केली. या महिलेने डोनाल्ड ट्रम्प यांना हिंदीत Ch*#@#a म्हटले. अमेरिकन राजकीय तज्ज्ञ कॅरोल क्रिस्टीन फेअर यांनी एका पाकिस्तानी-ब्रिटिश पत्रकार मोईद पिरजादा यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना शिव्या घातल्या.

मुलाखतीदरम्यान कॅरोल क्रिस्टीन फेअर या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचंड नाराज असल्याचे पाहायला मिळाले. मुलाखतीदरम्यान कॅरोल म्हणाल्या, 'नोकरशाही ट्रम्पला सांभाळून घेईल, असे माझ्यातील आशावादी व्यक्तीला वाटते. पण माझ्यातील निराशावादी व्यक्ती म्हणते, फक्त सहा महिने झाले आहेत आणि आपल्याला या Ch*#@#a सोबत चार वर्ष पूर्ण करायची आहेत.' हे ऐकून मोईद पिरजादा यांना हसू आवरता आले नाही.

पाकिस्तानी-ब्रिटिश पत्रकार मोईद पिरजादा म्हणाले, 'मी हा शब्द वारंवार उर्दूमध्ये बोलतो आणि माझे बरेचसे लोक या शब्दावर आक्षेप घेतात. आज तुम्ही हा शब्द चर्चेत वापरला आहे. या शब्दाला इतकं महत्त्व आहे की, काही परिस्थिती अशा आहेत ज्यांचे वर्णन या शब्दाशिवाय करता येत नाही. त्यानंतर कॅरोल क्रिस्टिन म्हणाल्या, ट्रम्पच्या गाडीची नंबर प्लेट सुद्धा Ch*#@#a आहे.

'ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या प्रतिमेबद्दल मी काहीही सांगू शकत नाही. दुर्दैवाने ट्रम्प प्रशासनातील अनेक अधिकारी त्यांच्या क्षेत्रात फारसे तज्ज्ञ नाहीत. प्रत्येक अमेरिकन नागरिकाला आपली नोकरशाही कशी आहे कशी आहे हे लक्षात ठेवावे लागेल. या नोकरशाहीने हे संबंध मजबूत करण्यासाठी २५ वर्षे काम केले आहे. आपण परराष्ट्र खात्याचे हजारो कर्मचारी गमावले आहेत' असे वक्तव्य कॅरोल क्रिस्टीन फेअर यांनी केले.

कॅरोल क्रिस्टीन फेअर या अमेरिकन राजकीय तज्ज्ञ आहेत. जॉर्जटाऊन विद्यापीठात त्या प्राध्यापिका आहेत. दक्षिण आशियाई राजकारण आणि लष्कर या विषयात त्यांचा अभ्यास आहे. त्यांनी रँड कॉर्पोरेशन, अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्रे आणि यूएस इन्स्टिट्यूट ऑफ पीस येथे काम केले आहे. धाडसीपणा आणि स्पष्टवक्तेपणा यासाठी त्या प्रसिद्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Happy Ganesh Chaturthi 2025 Wishes : गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा या खास शुभेच्छा

Crime News: पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नीचा उपवास; अंडा करीसाठी नकार देताच नवऱ्याची मती खुंटली, अन्...

BCCI चं १२५ कोटी रुपयांचं नुकसान; Dream ११ नंतर आणखी एका कंपनीने साथ सोडली?

Gautam Gaikwad: सिंहगडावरून तरुण बेपत्ता कसा झाला? ५ दिवसांत काय-काय घडलं, गौतम गायकवाडने सांगितला थरारक किस्सा

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का, बड्या नेत्याचा राजीनामा; शिंदे गटात जाणार

SCROLL FOR NEXT