Donald Trump Threatens India Tarrif saam tv
देश विदेश

Donald Trump : २४ तासांत भारतावर टॅरिफ बॉम्ब; डोनाल्ड ट्रम्पची पुन्हा धमकी, कारण काय?

Donald Trump threatens India tariffs over russian oil trade : रशियासोबतची मैत्री अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खुपली असून, त्यांनी भारतावरील टॅरिफ वाढवण्याची घोषणा केली आहे. पुढील २४ तासांत भारतावरील मोठ्या प्रमाणात टॅरिफ वाढवण्यात येईल, असं ट्रम्प म्हणाले.

Nandkumar Joshi

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला गेल्या २४ तासांत दुसऱ्यांदा धमकी दिली आहे. भारत चांगला व्यापारी भागीदार राहिला नाही. भारताची रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच आहे. जर भारतानं हे तातडीनं थांबवलं नाही तर पुढील २४ तासांत भारतातून आयात केलेल्या वस्तूंवर सध्याच्या २५ टक्क्यापेक्षा जास्त टॅरिफ वाढवण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सीएनबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत भारताला थेट धमकी दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, ते युद्ध मशीनला इंधन देण्याचं काम करत आहेत. जर ते असे करत असतील तर मला फार आनंद होणार नाही. त्यांच्याकडून आकारण्यात येणारे शुल्क खूप जास्त आहे आणि हीच खरी अडचण आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा भारताला धमकावले आहे. पुढील २४ तासांत भारताला मोठ्या प्रमाणात टॅरिफ आकारला जाईल, असा इशारा त्यांनी दिलाय. याआधी सोमवारीही ट्रम्प यांनी भारताला धमकावले होते. भारत मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करत आहे. ते विकून मोठा नफाही मिळवत आहे. रशियासोबतच्या व्यापारामुळं भारताचं टॅरिफ वाढवण्यात येईल, असं ट्रम्प म्हणाले होते.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्टद्वारे याकडे लक्ष वेधलं होतं. भारत रशियाकडून केवळ तेल खरेदी करत नाही तर, त्या तेलातील मोठा वाटा बाजारात विकून प्रचंड नफा कमावत आहे. रशियाच्या युद्ध मशिनरीमुळं युक्रेनमध्ये किती लोक मारले जात आहेत, त्याची भारताला पर्वा नाही. त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेत आहे, असं ट्रम्प म्हणाले होते.

ट्रम्पच्या धमकीवर भारताची भूमिका

ट्रम्प यांच्या धमकीवर भारतानं भूमिका स्पष्ट केली आहे. ट्रम्प यांचं वक्तव्य अयोग्य आणि अतर्क्य आहे. परराष्ट्र मंत्रालयानं त्यासंबंधी एक निवेदन प्रसिद्ध केलं आणि ट्रम्प यांच्या वक्तव्यावरून अमेरिकेवर टीका केली. अमेरिका एका बाजूने स्वतः रशियासोबत व्यापार करत आहे. पण तोच अमेरिका दुसरीकडं भारत-रशिया व्यापाराकडे बोट दाखवत आहे, याकडं भारतानं लक्ष वेधलं आहे. कठोर प्रतिबंध आणि मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादूनही अमेरिकेने रशियासोबत जवळपास ३.५ अब्ज डॉलरचा व्यापार केला होता.

भारतानं अमेरिकेच्या दुटप्पी धोरणावर टीकास्त्र सोडलं होतं. अमेरिका अजूनही रशियाकडून आपल्या अण्वस्त्र उद्योगासाठी युरेनियम हेक्साफ्लोराइड, इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी पॅलेडियम, तसेच खते आणि रसायने आयात करत आहे. कोणत्याही प्रमुख अर्थव्यवस्थेप्रमाणे भारत आपले राष्ट्रीय हित आणि अर्थसुरक्षेच्या रक्षणासाठी सर्व आवश्यक पावले उचलणारच, असं भारतानं ठणकावून सांगितलं आहे.

ट्रम्प यांच्या धमकीवर रशियानंही ठणकावलं

ट्रम्प यांच्या धमकीनंतर रशियानंही अमेरिकेला जोरदार उत्तर दिलं आहे. रशियाच्या राष्ट्रपती भवनचे प्रवक्ता दिमित्री पेस्कोव्ह यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमेरिकेवर टीकास्त्र सोडलंय. आम्ही अशा प्रकारची अनेक वक्तव्ये ऐकतो, खरे तर त्या धमक्या असतात. अशा प्रकारच्या धमक्यांद्वारे अन्य देशांना रशियासोबत व्यापारी संबंध संपुष्टात आणण्यासाठी भाग पाडण्याचे प्रयत्न आहेत. आम्ही अशी वक्तव्ये वैध मानत नाहीत, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. देशांना आपले व्यापारी भागीदार, व्यापार आणि आर्थिक सहकार्यासाठी भागीदार निवडण्याचा अधिकार असायला हवा आणि तो आहेच, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: आशियातील सर्वात मोठे गाव भारतात कोणत्या भागात आहे?

Raisin Price : चिनी बेदाण्याने मार्केट खाल्ले; महिन्याभरापासून बेदाणा दरात घसरण, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Maharashtra Live News Update: माधुरी हत्तीणीबाबत वनताऱ्याच्या अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांची चर्चा

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदेंमध्ये वर्चस्वाची लढाई, एकाच पदासाठी दोघांकडून वेगवेगळ्या अधिकाऱ्याची नियुक्ती

Amruta Khanvilkar : अमृताने पटकावला पहिला राज्य चित्रपट पुरस्कार,'चंद्रमुखी'चं सर्वत्र होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT