Donald Trump orders airstrike on ISIS in Nigeria : अमेरिकन सैनिकांनी नायजेरियातील आयसिसच्या ठिकाणांवर एअर स्ट्राइक केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतचे आदेश दिले. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत आयसिसच्या तळावर हल्ला केल्याची माहिती दिली. ऑक्टोबरमध्ये नायजेरियातील आयसिसच्या दहशतवाद्यांनी ख्रिश्चन लोकांची हत्या केली होती. त्यामुळे बदला घेण्यासाठी ट्रम्प यांनी एअर स्ट्राइक करण्याचे आदेश दिले. ईशान्य नायजेरियात असलेल्या आयसिस दहशतवाद्यांवर अमेरिकन सैन्याने केलेल्या हल्ल्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये विमानातून बॉम्ब हल्ला केल्याचे दिसत आहे.
ऑक्टोबर २०२५ मध्ये नायजेरियात लपलेल्या दहशतवाद्यांनी ख्रिश्चन लोकांवर हल्ला केला होता. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून ट्रम्प यांनी इशादा दिला होता. नायजेरिया सरकार दहशतवाद्यांना रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. अमेरिकाने दखल दिली नाही तर नायजेरियातील ख्रिश्चनांचं अस्तित्व धोक्यात येईल, असे ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये काय म्हटले.
ज्या ख्रिश्चनांची निर्दयी आणि क्रूर पद्धतीने हत्या केली त्यांच्यासाठी अमेरिकन सैन्याने ही कारवाई केली. अमेरिकेच्या सैन्याने नायजेरियातील आयसिसच्या लक्ष्यांवर शक्तिशाली आणि प्राणघातक हल्ला केला. हे दहशतवादी प्रामुख्याने निष्पाप ख्रिश्चनांना लक्ष्य करत होते. अमेरिका "कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाला" वाढू देणार नाही. जर ख्रिश्चनांची कत्तल सुरू राहिली तर आणखी दहशतवाद्यांवर हल्ला केला जाईल. मृत झालेल्या सर्व दहशतवाद्यांना मेरी ख्रिसमस!
नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनीही ख्रिसमसच्या दिवशी (२५ डिसेंबर) सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यांनी धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे वचन दिले. विविध धर्माच्या नायजेरियातील लोकांना हिंसाचारापासून वाचवण्यासाठी माझ्या शक्तीनुसार सर्वकाही करेन, असे त्यांनी म्हटलेय.
नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनीही ख्रिसमसच्या दिवशी (२५ डिसेंबर) सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यांनी धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे वचन दिले. विविध धर्माच्या नायजेरियातील लोकांना हिंसाचारापासून वाचवण्यासाठी माझ्या शक्तीनुसार सर्वकाही करेन, असे त्यांनी म्हटलेय.
दरम्यान, अमेरिकन सैन्याच्या आफ्रिका कमांडरनेही हवाई हल्ल्याची माहिती शेअर केली. हा हल्ला नायजेरियन सरकारच्या विनंतीवरून करण्यात आला आणि त्यात अनेक दहशतवादी मारले गेले, असे त्यांनी म्हटलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.