Geopolitical tensions escalate as the United States confronts Russia and China across the Arctic and the Middle East. Saam Tv
देश विदेश

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मास्टर प्लॅन

बर्फाळ ग्रीनलँड... धगधगता इराण... आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा तो एक 'मास्टर प्लॅन'! जगाचा विनाश आता केवळ एका क्लिकवर आहे का? कारण व्हाईट हाऊसच्या एका निर्णयानं मॉस्कोपासून बीजिंगपर्यंत भूकंपाचे धक्के बसलेत. अमेरिकेने एकाच वेळी दोन आघाड्यांवर युद्ध पुकारलंय. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये पाहा... महासत्तांच्या संघर्षाची ही इनसाईड स्टोरी!"

Omkar Sonawane

जगातील राजकारण आता अशा वळणावर आलंय ज्याठिकाणी कुठल्याही क्षणी तिसऱ्या युद्धाची ठिणगी पडू शकते. अमेरिकेनं एकाच वेळी दोन आघाड्यांवर युद्ध पुकारण्याचे संकेत दिलेत.एकीकडे आर्कटिकमधील ग्रीनलँड आणि दुसरीकडे मध्य पूर्वेतील इराण...

या दोन ठिकाणांवरून अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यात थेट संघर्ष सुरू झालाय. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत अमेरिकेनं डेन्मार्कला उघडपणे सुनावलंय. ग्रीनलँड सांभाळणं त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँडच्या माध्यमातून रशिया आणि चीनची नाकेबंदी करायचीय.

आर्कटिक क्षेत्रात आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी ग्रीनलँड हे अमेरिकेसाठी सर्वात मोठं हत्यार ठरणारेय. दुसरीकडे, इराणमधील अंतर्गत बंडाळीचा फायदा घेत अमेरिका तिथे लष्करी कारवाईच्या तयारीत आहे. ट्रम्प प्रशासनानं इराणमध्ये सत्तापालट करण्याचा इरादा स्पष्ट केलाय. या परिस्थितीमुळे जगाचे दोन गट पडलेत.

एकीकडे अमेरिका आणि त्याचे मित्र देश तर दुसरीकडे इराणच्या पाठीशी उभे राहिलेले रशिया आणि चीन. या दोन आघाड्यांवरील संघर्षामुळे रशिया आणि चीनला गुडघ्यावर टेकवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. तज्ज्ञांच्या मते, ही केवळ दोन देशांमधील चुरस नसून तिसऱ्या महायुद्धाची चाहूल आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: अनपेक्षित घटना घडतील, वैवाहिक जीवनात येईल आनंद; ३ राशींसाठी आज दिवस ठरेल महत्त्वाचा

BMC Elections: एकीकडं महापौरपदासाठी चढाओढ, दुसरीकडं हॉटेल पॉलिटिक्स, मुंबईत शिजतंय तिसरंच राजकारण...

शतप्रतिशत भाजपामुळे मित्रपक्षांनाही धक्का, भाजपने दाखवला मित्रपक्षांना हिसका

२५ वर्षांची सत्ता संपली! ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका का गेली?

मुंबईत महापौरपदासाठी शिंदेंची फिल्डिंग? शिंदेंना हवंय मुंबईचं महापौरपद?

SCROLL FOR NEXT