Donald Trump is scared of aggressive Iran Attacks Saam Tv News
देश विदेश

आक्रमक इराणला पाहून टरकले ट्रम्प, कतारमध्ये घुसून अमेरिकेला चपराक; अन्याय अमान्य, खोमेनींची गर्जना

Iran Israel War : अमेरिकेनं युद्धबंदीची घोषणा केल्यानंतरही इराणनं इस्त्रायलवर जोरदार हल्ले चढवले. त्याला इस्त्रायलनंही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.त्यामुळे इराणनं अमेरिकेला कसा घाम फोडला ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Snehil Shivaji

स्नेहील झणके, साम टिव्ही

इराण इस्रायलच्या युद्धात अमेरिकेनं उडी घेतली आणि मित्रराष्ट्र इस्रायलसाठी सर्वात महागडी B-2स्टेल्थ बॉम्बर विमानं वापरून इराणमधील आण्विक स्थळं नष्ट करत इराणची स्वप्न मातीमोल केली. इराणमध्ये घूसुन कारवाई झाल्यानंतर संतप्त खोमेनींनी बदला घेण्याचा निर्धार करत अमेरिकेच्या सगळ्या धमक्यांना केराची टोपली दाखवून अमेरिकेला जन्माची अद्दल घडवली. इराणनं अमेरिकेसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या कतारच्या अल उदीद आणि इराकमधील असद या लष्करी हवाई तळावर हल्ला करुन अमेरिकेला गुडघ्यावर आणलंय.

इराणच्या आक्रमक हल्ल्यानंतर अमेरिकेत बसलेल्या ट्रम्प प्रशासनाची तंतरली आणि पहाटे पहाटेच महासत्तेच्या प्रमुखांना धडाधड ट्विटकरत युद्ध विरामाची घोषणा करावी लागली. इराणनं इराक मध्ये घुसून केलेला हल्ला म्हणजे अमेरिकेला कानफटवल्याच म्हणत इराणी जनतेनं जल्लोष केलाय. कशाच्याही बदल्यात अन्याय स्वीकारणार नाही, आम्ही कधीच झुकणार नाही. म्हणत खोमेनींनी ट्रम्प यांनी युद्धविरामाच्या घोषणेला धुडकावून इस्रायलवर पुन्हा बॉम्ब हल्ले सुरुच ठेवले. चवताळलेल्या इराणला पाहून सध्या इस्रायल थंड पडलाय. तर एकाही अमेरिकी सैन्यावर हल्ला झाला तर अशी कल्पनेपलीकडील हल्ला करु अशा बाता मारणाऱ्या ट्रम्प यांनी मात्र 90 अंशात युटर्न घेत इराणसोबतचं इस्रायलला सुनावलंय.

इराणचं धगधगतं रुप पाहून इस्रायल सोबतचं ट्रम्प प्रशासनाची पाचावर धारण बसली. इस्रायलला युद्धाच्या खड्ड्यात लोटून ट्रम्प यांनी या इराणच्या आक्रमकतेपुढे नमतं घेतलं की काय असा प्रश्न उपस्थित झालाय. यामुळे अमेरिकेनं युक्रेनसारखं इस्रायलाही वाऱ्यावर सोडल्याच्या चर्चांना उत आलाय. आता इराणच्या करो या मरोच्या हल्ल्यांनंतर इस्रायल काय भूमिका घेत आणि इराणचा राग कधी शांत होतो हे पाहणं महत्त्वाचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT