CBI Action: ईडीच्या २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडलं

CBI arrests two ED officers: सीबीआयने सापळा रचत ईडीच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं. या दोन्ही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
CBI Action: ईडीच्या २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडलं
ED Bribe CaseSaam Tv
Published On: 
  • सीबीआयने लाचखोरी प्रकरणात २ ईडी अधिकाऱ्यांना अटक केली

  • लखनऊमध्ये ५ लाखांच्या कथित लाचखोरी प्रकरणात सीबीआयची कारवाई

  • ईडी प्रकरणात मदतीच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप

ईडीच्या दोन अधिकाऱ्यांना सीबीआयने अटक केली. ५ लाखांची लाच स्वीकारताना या दोघांना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडलं. लाचखोरी प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. लखनऊ ईडी झोनचे ईडीचे अधिकारी दीपक कुमार आणि हेड कॉन्स्टेबल मनोज द्विवेदी अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत.

ईडीच्या प्रकरणात मदत करण्याच्या बदल्यात तक्रारदाराच्या वडिलांकडे ५ लाख रुपयांची लाच या अधिकाऱ्यांनी मागितली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच सीबीायने २३ ऑक्टोबर रोजी सापळा रचून मनोज द्विवेदीला ५ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. ही लाच कथितरित्या ईडीचे वरिष्ठ अधिकारी दीपक कुमार यांच्यासाठी घेतली जात होती. सीबीआयने दोन्ही अधिकाऱ्यांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, लखनऊ झोनमधील ईडी कार्यालयाने लाचखोरीच्या एका प्रकरणात ई़डीच्या एका अधिकाऱ्याला आणि एका हेड कॉन्स्टेबलला अटक केली. एका तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सीबीआयने २३ ऑक्टोबर २०२६ रोजी लखनऊ येथील एका ईडी अधिकारी आणि हेड कॉन्स्टेबल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराच्या वडिलांकडून त्यांनी लाचेची मागणी केली होती.

CBI Action: ईडीच्या २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडलं
ED चे अधिकारीच निघाले चोर! मुंबईतील व्यावसायिकाकडून उकळले २.२५ कोटी; थेट गुन्हा दाखल

असा आरोप आहे की, आरोपी हेड कॉन्स्टेबलने ईडी प्रकरणात मदतीच्या बदल्यात तक्रारदाराच्या वडिलांकडे लाचेची मागणी केली. या प्रकरणासंदर्भात तक्रारदाराच्या वडिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२६ मध्ये ईडी कार्यालयाकडून दोन समन्स मिळाले होते. तो ५ लाख रुपयांची लाच मागत होता. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सीबीआयने सापळा रचला. त्यावेळी त्यांनी आरोपी हेड कॉन्स्टेबलला पैसे घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

CBI Action: ईडीच्या २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडलं
तिरूपतीच्या प्रसादात भेसळयुक्त तुपाचा वापर, ED ने कंपनीच्या मालकाला ठोकल्या बेड्या, देशभरात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com