
सुप्रीम मस्कर, साम टीव्ही
जगातील फॅशन हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलान शहरात जगप्रसिद्ध इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाचा 'स्प्रिंग समर 2026' फॅशन शो सुरु होता. रॅम्पवर येणाऱ्या एका मॉडेल्सच्या पायात चक्क मराठमोळी कोल्हापुरी चप्पल पाहायला मिळाली. आणि भारतीयांच्या भुवया उंचावल्या. प्राडाच्या रॅम्पवर कोल्हापुरी चप्पल दिसल्याची चर्चा सुरु असतानाच या कोल्हापुरी चप्पलची किंमत ही समोर आली..प्राडानं या चप्पलेची किंमत लावली होती 1 हजार युरो म्हणजे तब्बल 1 लाख 16 हजार रुपये
Prada सारख्या ब्रँडने कोल्हापुरी चप्पलांचा डिझाईन वापरून एक लक्झरी प्रॉडक्ट तयार केला हे कौतुकास्पद असलं, तरीही अनेकांनी हा भारतीय डिझाईनचा 'फर्स्ट कॉपी' वापर असल्याची टीका केली आहे. पारंपरिक उत्पादनांना त्यांचे श्रेय देणे गरजेचे आहे, असं ही म्हटलंय. कारण कोल्हापुरी चप्पलेला आधीच GI टॅग देण्यात आलाय. त्यामुळे GI टॅग व्यतिरिक्त इतर ठिकाणी कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्यांची कारागिरांना तक्रार करता येते.
कोल्हापुरी चप्पलांचं वैशिष्ट्यं काय आहे? आणि या चप्पलेला जगभरातून मागणी का आहे? पाहूयात..
जगात भारी 'कोल्हापुरी चप्पल
100% नैसर्गिक चामड्यापासून बनवली जाते.
अॅलर्जी किंवा उष्णतेपासून संरक्षण मिळते
लोखंडी खिळे, मशीनचा वापर नाही
टिकाऊपणा, लवचिकता आणि कलाकुसरीमुळे प्रसिध्द
कोल्हापुरी चप्पलेचा इतिहास सुमारे 700 वर्षांपूर्वीचा आहे. ही चप्पल केवळ एक पादत्राण नसून, पारंपरिक कौशल्य, स्थानिक जीवनशैली आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहे. त्यामुळे भारतीय परंपरेचा भाग असलेली कोल्हापुरी चप्पल प्राडाच्या रॅम्पवर 1 लाखांपर्यंत पोहचलीय. मात्र, ती चप्पल पारंपरिक भावनेने घालायची की लक्झरी स्टेटमेंट म्हणून, हे प्रत्येकाच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.