डोनाल्ड ट्रम्प लाइव्ह पत्रकार परिषदेदरम्यान झोपले
डोनाल्ड ट्रम्प यांचा झोपतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला
नेटकऱ्यांनी त्यांना स्लीपी डॉन”म्हणत ट्रोल करायला सुरुवात केली
ट्रम्प पूर्वी जो बायडेन यांना स्लीपी जो म्हणत ट्रोल करत होते
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका महत्वाच्या पत्रकार परिषदेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना झोप लागल्याचा हा व्हिडीओ आहे. व्हाइट हाऊसमधील त्याच्या ओव्हल ऑफिसमध्ये ही पत्रकार परिषद सुरू होती. या पत्रकार परिषदेत काही मुद्द्यांवर चर्चा सुरू होती त्याचवेळी खुर्चीवर बसलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना डुलकी लागली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, वजन कमी करणाऱ्या औषधांच्या किमती कमी करण्याबाबत व्हाइट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये लाइव्ह पत्रकार परिषद सुरू होती. त्या पत्रकार परिषदेरम्यान ही घटना घडली. या पत्रकार परिषदेत लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात डोनाल्ड ट्रम्प झोपले असल्याचे कैद झाले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओवर अनेक मीम्स तयार केले जात असून ट्रम्प यांना ट्रोल केले जात आहे.
स्लीपी डॉन असे कॅप्शन देत हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कॅलिफॉर्नियाचे गव्हर्नर गेविन यांनी डोनाल्ड्र ट्रम्प यांचा झोपतानाचा फोटो शेअर करत लिहिले की, डोजी डॉन इज बॅक. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये त्यांना गाढ झोप लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांना इतकी झोप लागली की डोळे पण उघडता येत नसल्याचे व्हिडीओत दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हाईट हाऊस डॅमेज कंट्रोलमध्ये गुंतले आहे. व्हाईट हाऊसचे म्हणणे आहे की, हे मुद्दाम चुकीच्या पद्धतीने व्हायरल केलं जात आहे.
सध्या नेटकरी सोशल मीडियावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. नेटकऱ्यांनी त्यांना 'स्लीपी डॉन' असे म्हणत खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. एकेकाळी जो बायडेन यांच्या प्रकृतीची खिल्ली उडवणारे ट्रम्प स्वतःच विनोदाचे पात्र बनले आहेत. ट्रम्प एकेकाळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना 'स्लीपी जो' असे संबोधून त्यांची खिल्ली उडवत असत आता त्यांचा झोपतानाचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यावरून त्यांनाच नेटकरी धारेवर धरत आहेत. या घटनेनंतर ट्रम्प यांच्या प्रकृतीबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.