donald trump news  Saam tv
देश विदेश

युद्ध पेटलं! राष्ट्राध्यक्षांसह पत्नीला ठेवलं ओलिस; डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ

donald trump news : व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांसह पत्नीला ओलिस ठेवण्यात आलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

अमेरिकी सैन्य दलाचा व्हेनेझुएलावर हल्ला

व्हेनेझुएलावर हल्ला केल्याचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचाही दावा

व्हेनेझुएलाकडून कोणतीही प्रतिक्रिया आल्याचे समोर आलेलं नाही

अमेरिकी सैन्य दलाचे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ओलीस ठेवलं आहे. दोघांना देशांच्या बाहेर नेण्यात आलं आहे. व्हेनेझुएलावर शनिवारी सकाळी अमेरिकेने हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्याबाबत व्हेनेझुएलाने दुजोरा दिलेला नाही. परंतु अमेरिकेकडून सातत्याने दावा करण्यात येत आहे.

व्हेनेझुएलामधील सैनिकांच्या सर्व छावण्यांवर हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर काही तासांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यंन व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीला ओलिस ठेवण्यात आल्याची माहिती दिली.

'मोठ्या प्रमाणात हल्ले केल्यानंतर निकोलस मादुरो यांना ओलिस ठेवलंय. निकोलस यांच्या पत्नीला देखील ओलीस ठेवलं आहे. या दोघांना देशाच्या बाहेर नेण्यात आलं आहे,असे ट्रम्प यांन म्हटलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामधील सैन्य दलाच्या छावण्यांसहित इतर ठिकाणी देखील हल्ले करण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे.

ट्रम्प यांनी काय म्हटलंय?

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे म्हटलं की, 'अमेरिकेने दावा केला आहे की, व्हेनेझुएला आणि त्यांच्या अनेक नेत्यांना ओलिस ठेवलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटलं की, 'सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ'वर लिहिलं आहे की, 'अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीलाही ओलिस ठेवण्यात आलंय. त्यांना देशाबाहेर नेण्यात आलंय. हे ऑपरेशन अमेरिकेच्या लॉ एनफोर्समेंटच्या साथीने करण्यात आलं आहे. या सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल. यासंबंधित आज सकाळी ११ वाजता एक पत्रकार परिषद होईल. या प्रकरणाकडे लक्ष केंद्रीत केल्याबद्दल धन्यवाद'.

अमेरिकेने ड्रग्स तस्करीचा आरोप करत व्हेनेझुएलावर हल्ले केले आहेत. दोन्ही देशांमध्ये तणावजन्य परिस्थिती असल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या जहाजांवरही हल्ले करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते होणार ध्वजारोहण, कर्तव्यपथावर दीड तास परेड चालणार

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अर्थसंकल्पानंतर खात्यात जमा होणार ₹२०००, समोर आली मोठी अपडेट

Mumbai Local: नवी मुंबईकरांना मोठं गिफ्ट! आजपासून हार्बर मार्गावर धावणार १४ एसी लोकल; आताच पाहा वेळापत्रक

Panchang Today: प्रजासत्ताक दिनी पंचांगाचा प्रभाव; २६ जानेवारीला कोणत्या राशींना मिळणार लाभ?

Sweets Recipe : अचानक घरी पाहुणे आले? ब्रेडपासून बनवा 'ही' शाही स्वीट डिश, चव अशी की सगळेच म्हणतील WOW

SCROLL FOR NEXT