Donald Trump Saam Tv
देश विदेश

Donald Trump: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीआधी अमेरिकेनं दिली होती धमकी; डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा दावा

Trump Statement On India Pakistan War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीआधी दोन्ही देशांना धमकी दिली होती. ट्रम्प यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पण भारताने हा दावा फेटाळून लावला आहे.

Priya More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, 'मी भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी केली. मी युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांना सांगितले होते की युद्ध थांबवले तरच तुमच्यासोबत व्यापार करेल. जर युद्ध थांबले नाही तर व्यापार करणार नाही.' पण डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे.

अमेरिकेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच असा दावा केला की, 'शनिवारी माझ्या प्रशासनाने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील युद्धाला विराम देण्यासाठी मदत केली. मला वाटते की हे एक स्थायी युद्धविराम असेल. दोन्ही देशांकडे खूप सारे अणुबॉम्ब आहेत. त्यामुळे शांतता खूपच गरजेची आहे.'

यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारासंदर्भात मोठा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकेने दोन्ही देशांना स्पष्ट शब्दात सांगितले की जर तुम्ही युद्ध थांबवले तरच आम्ही व्यापार करू. पण जर तुम्ही युद्ध थांबवले नाही तर आम्ही व्यापार बंद करू.' ट्रम्प यांनी असा देखील दावा केला की, 'मी ज्या पद्धतीने व्यापाराचा वापर करून वाद मिटवला हे अजूनपर्यंत कुणी केले नसेल.'

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान मध्यस्थीवर असे देखील सांगितले की, 'आम्ही अणुबॉम्ब संघर्षाला थांबवले आहे. मला वाटते की हे एक खूपच भयंकर युद्ध झाले असते. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला असता. मी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस आणि परराष्ट्रमंत्री मार्को रूबियो या दोघांना त्यांच्या कामाबद्दल धन्यवाद म्हणतो. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे. कारण भारत सरकारने आधीच सांगितले होते की, 'युद्ध थांबवण्यासाठी तिसऱ्या राष्ट्राची कोणतिही भूमिका गरजेची नाही.' त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा करून भारत सरकारला अडचणीत टाकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Maharashtra Live News Update: २६ ऑक्टोबरपासून नाशिक-दिल्ली आणि हैदराबाद मार्गावर प्रत्येकी २ फ्लाइट

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT