Global attention turns to Iran after Donald Trump questions the status of Supreme Leader Mojtaba Khamenei amid escalating Middle East tensions. Saam Tv
देश विदेश

अयातुल्लानंतर मोजताबा खामेनींचाही खात्मा? जगात खळबळ

Donald Trump Claim Mojtaba Khamenei Death: इराणमध्ये मरीन कमांडो उतरवण्याच्या हालचालीनंतर आता अमेरिकेनं आणखी एक दावा केलाय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडालीये. काय आहे हा दावा? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

इस्त्रायल-अमेरिकेकडून इराणवर भीषण बॉम्बहल्ला केला जातोय. त्यामुळे मध्य-पूर्वेतील संघर्ष आता टोकाला पोहचलाय. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनं इरेस पेटलेला इराणही शत्रू राष्ट्रांवर जोरदार प्रतिहल्ला करतोय. इस्त्रायल-अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणनं खामेनींचा मुलगा मोजताबा खामेनींना देशाच्या सर्वोच्च नेतेपदी बसवलं. मात्र, याच मोजताबा खामेनींबाबत आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानं जगात खळबळ उडालीये. ट्रम्प यांनी एका मुलाखतीत मोजताबा यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.

इराणमधील खामेनींची राजवट उलथवू या ट्रम्प यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली नसती तरच नवल. अमेरिकेने मोजताबा खामेनींबाबत आतापर्यंत केलेले दावा काय आहेत पाहूयात. अमेरिकेच्या दाव्यानुसार, इराणच्या सर्वोच्च नेतेपदी नियुक्त झाल्यापासून मोजतबा खामेनी बेपत्ता आहेत. सुरुवातीच्या हल्ल्यात ते जखमी झाल्याचा दावा अमेरिकेनं केला होता. अमेरिकेचे संरक्षण सचिवांनी मोजताबांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असावी म्हटलंय. तर न्यूयॉर्क टाईम्सनं मोजतबा यांच्या पायाला जखम झाल्याचं वृत्त दिलं होतं.

खरंतर, मोजताबा खामेनींनी पडद्यामागून होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्यासंदर्भात मोठं विधान करत इराण हे युद्ध दिर्घकाळ लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र अमेरिकेकडून सातत्यानं त्यांच्या आरोग्याबाबत अनेक दावे केले जाताहेत. असं जरी असलं तरी अमेरिकेचे हे दावे इराणनं फेटाळून लावलेत. त्यामुळं वडिलांप्रमाणेच मोजताबा खामेनी यांचाही मृत्यू झालाय का ? इराणची पुढची रणनिती काय असेल ? याकडे फक्त इस्त्रायल-अमेरिका नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मतीन पटेलच्या घरावर होणार

Mothers Day Special : तुमच्याही आईला फिरायला आवडतं? मदर्स डेला 'या' ५ बजेट फ्रेंडली ठिकणी नक्की घेऊन जा

Satara Tourism : सह्याद्रीच्या विहंगम दृश्यात हरवलेला किल्ला, महाबळेश्वरला गेल्यावर 'हे' ऐतिहासिक ठिकाण फिरा

Singer Death: 'पालखी निघाली राजाची' गाण्याच्या संगीतकाराचे निधन; गणेशभक्तांमध्ये हळहळ

कॅबिनेटमध्ये होणार फेरबदल; मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार, या नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

SCROLL FOR NEXT