Tarrif saam tv
देश विदेश

Tarrif: ही एक अट पूर्ण करा अन् टॅरिफमधून सुटका मिळवा; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचं मोठं विधान

Indias Russian Oil Purchase: अमेरिकेने भारतावर कालपासून ५० टक्के टॅरिफ लादला आहे. दरम्यान, भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे, त्यामुळे अमिरेकेने भारतावर ही कारवाई केली आहे.

Siddhi Hande

अमेरिकेने काल भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू केला. याचा थेट भारतावर परिणाम होत आहे. दरम्यान, आता यावर व्हाईट हाउसचे सल्लागार पीटर नवारो यांनी एका मुलाखतीत माहिती दिली आहे. दरम्यान, त्यांना युक्रेन संघर्षाचा 'मोदींचे युद्ध' असं म्हणून उल्लेख केला आहे.

पीटर नवारो यांनी सांगितले की, भारत हा रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करत आहे त्यामुळे रशियाच्या आक्रमकतेला भर दिली आहे. याचा थेट भार अमेरिकन करदात्यांवर पडला आहे. दरम्यान, त्यांनी असंही सांगितलं की, भारतावरील २५ टक्के टॅरिफ रद्द होऊ शकतो. परंतु यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे.

ब्लूमबर्ग टेलिव्हिजनच्या बॅलन्स ऑफ पॉवरला पीटर नवारो यांनी मुलाखत दिली. यात त्यांनी रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा उल्लेख करत म्हटलंय की, शांततेचा मार्ग नवी दिल्लीतून जातो.दरम्यान, भारताला रशियाकडून तेल न खरेदी करण्यास सांगितले होते. मात्र, पाश्चात्य दबावाला न जुमानता भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे. यामुळे भारतावर ५० टक्के टॅरिफ कर लादला आहे. हा कर कालपासून लागू झाला आहे.

ही एक अट पूर्ण करा अन् टॅरिफमधून सुटका मिळवा

अमेरिकने भारतावर लादलेला टॅरिफ कमी होण्याची शक्यता आहे का?, असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावर पीटर नवारो यांनी सांगितले की, हे सोपे आहे. जर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले तर उद्याच त्यांना टॅरिफपासून २५ टक्क्यांची सूट मिळू शकते.

भारतावर नाराजी

पीटर नावोरो यांनी भारतावर नाराजी व्यक्त केली आहे. भारताने टॅरिफबाबत जी भूमिका घेतली आहे ती त्यांना पटलेली नाही. ते म्हणाले की, माझ्यासाठी धक्कादायक म्हणजे भारतीय याबाबत खूप उद्धटपणाने वागत आहेत. ते म्हणातयत की, आम्ही कुठे जास्त जास्त टॅरिफ आकारतो? हे आमचे सार्वभौमत्व आहे. आम्ही ज्यांच्याकडून हवं त्यांच्याकडून तेल खरेदी करु शकतो. भारताची ही भूमिका अमेरिकेला पटलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT