Cyclones 
देश विदेश

Cyclone : मोठी बातमी! 'या' दोन चक्रीवादळांमुळे मान्सूनची चाल बिघडणार? हवामान खात्याचा मोठा इशारा

Dolphin And Chan-hom Cyclone : प्रशांत महासागरातील डॉल्फिन आणि चान-होम या शक्तिशाली चक्रीवादळांमुळे भारतीय मान्सूनच्या प्रवाहावर अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे. बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रवाह, कमी दाबाची क्षेत्रे आणि भारतातील पावसावर याचा काय परिणाम होऊ शकतो का?

Namdeo Kumbhar

Cyclone Dolphin and Chan-hom impact on Indian monsoon : भारतात मान्सूनचा प्रवास सुरू असतानाच आता प्रशांत महासागरातून चिंतेची बातमी समोर येत आहे. समुद्रात एकापाठोपाठ एक निर्माण झालेल्या 'डॉल्फिन' (Dolphin) आणि 'चान-होम' (Chan-hom) या दोन शक्तिशाली चक्रीवादळांमुळे भारतातील मान्सूनच्या प्रवाहावर मोठा परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

या दोन्ही वादळांमुळे हिंदी महासागरातून भारताच्या दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांची गती मंदावू शकते किंवा त्यांची दिशा बदलू शकते. यामुळे देशातील काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी होऊन मान्सूनमध्ये खंड पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे आता सर्वांचे लक्ष या दोन्ही चक्रीवादळांच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे. या वादळांमुळे स्थानिक भागात मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि महापुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम भारताच्या मान्सूनवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वर्षातील सर्वात शकिशाली चक्रीवादळ -

'डॉल्फिन' हे या वर्षातील चीनला धडकणारे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ठरले आहे. ९ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास या वादळाने चीनच्या झेजियांग प्रांतातील युहुआन भागात पहिली धडक (Landfall) दिली. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी तब्बल १५० ते १५१ किलोमीटर इतका भयंकर होता. पहिल्या धडकेनंतर अवघ्या एका तासात या वादळाने वेन्झोउ येथे दुसरी धडक दिली. चीनमध्ये पोहोचण्यापूर्वी या वादळाने जपानच्या दक्षिणी ओकिनावा प्रांतातही मोठा धुमाकूळ घातला होता. त्या ठिकाणी अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला असून काही नागरिक जखमी झाले आहेत.

चीनमध्ये धडकेलेल्या 'डॉल्फिन' या भयंकर चक्रीवादळामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. वादळामुळे चीनने तातडीने १० लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. यात एकट्या वेन्झोउ शहरातून तब्बल ९ लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मुसळधार पाऊस, महापूर आणि भूस्खलनाचा धोका पाहता प्रशासनाने सर्वोच्च पातळीचा 'रेड अलर्ट' जारी केला होता.

जपानला धोका किती?

'डॉल्फिन' वादळानंतर 'चान-होम' हे चक्रीवादळ जपानच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. हे वादळ जपानच्या होंशू बेटाच्या मध्य आणि ईशान्य भागाकडे सरकत आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत ते जपानच्या मुख्य भूमीवर धडकण्याची किंवा किनाऱ्यावरून जाण्याची शक्यता आहे. समुद्रात असताना हे वादळ अधिक तीव्र होऊ शकते; मात्र जपानच्या किनाऱ्यावर धडकेपर्यंत ते काहीसे कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय मान्सूनवर काय होणार परिणाम?

प्रशांत महासागरात निर्माण झालेली ही चक्रीवादळे थेट भारताच्या दिशेने येत नसली, तरी वाऱ्यांच्या चक्राकार प्रवाहामुळे (Atmospheric Circulation) त्यांचा भारतीय मान्सूनवर अप्रत्यक्ष प्रभाव पडू शकतो. प्रशांत महासागरातील ही शक्तिशाली वादळे हवेतील ओलावा (नमी) स्वतःकडे खेचून घेतात. त्यामुळे भारतीय उपखंडाच्या दिशेने येणारा बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रवाह कमकुवत होऊ शकतो. या वादळांमुळे बंगालच्या खाडीत नवीन कमी दाबाचे पट्टे (Low-Pressure Systems) तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. वादळे जास्त काळ सक्रिय राहिल्यास देशातील काही भागांत मान्सूनचा जोर ओसरून 'पावसाचा ब्रेक' पडू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT